कराड तालुक्यातील काले गावातील शेतकऱ्यावर बिबट्याच्या हल्ला: नागरिकांच्या जिवाशी खेळ.

काले (प्रतिनिधी) : एकीकडे एका तरुण शेतकऱ्यावरती शुक्रवारी रात्री बिबट्याने झडप घातलेली घटना तर दुसरीकडे बिबट्या विहिरीत पडलेली घटना या दोन्ही घटनेमुळे चर्चेला उधान आले. बिबट्याच्या हल्ल्यात काले तील संतोष पाटील हे जखमी झाले.

काले, संजयनगर येथील प्रगतशील व उपक्रमशील शेतकरी संतोष पाटील (आप्पा) यांच्यावर रात्री साडेआठच्या सुमारास दुचाकी वरून घरी परत परतत असताना बिबट्याने अचानक हल्ला केला .मात्र वेळेचे प्रसंगावधान साधून त्यांनी स्वतःवर नियंत्रण व गाडीवरती पूर्ण नियंत्रण कायम ठेवत तेथून आपली गाडी पुढे नेली. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. ही घटना संजय नगर काले रस्त्यावरील गुंडगे मळ्या च्या कॉर्नर वरती रात्री साडेआठच्या सुमारास घडली .नेहमीप्रमाणे संतोष पाटील हे रात्रीच्या वेळी गावातून काम आटपून घरी जात होते शेजारील लहानशा ऊस लागणीकडे च्या शेजारी मोठा ऊस होता .गाडी चा वेग कमी प्रमाणात होता पण अचानक ऊसातून खसखस असा आवाज आला अन काही कळताच त्यांच्यावरती बिबट्याने उडी मारून झडप घातली मात्र संतोष पाटील हे सावध असल्याने त्यांनी अंगावर झडप येते असे लक्षात येतात गाडीवरच आपला तोल सांभाळत मागे वाकले त्यामुळे बिबट्याच्या झडपे च्या पंजाचा त्यांच्या गळ्यावरती नख्याचा वन लागल्याने ते बचावले आणि आपली गाडी नियंत्रण ठेवत तेथून घरी परतले बिबट्याने हल्ला करून उसात पळ काढला आणि काही वेळातच तो दिसेनासा झाला . घरी आल्यानंतर त्यांनी ही घटना कोणालाही न सांगता. स्वतःच डेटॉलने जखम झालेली जागा स्वच्छ केली व त्या ठिकाणी घरातच प्राथमिक उपचार केले .सकाळी ते काले येथील प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये उपचारासाठी आल्यानंतर सविस्तर घटना अनेकांना समजली त्यांच्या गळ्यावरती बिबट्या ची नखे उमटल्याने त्यांना जखम झाली आहे याची माहिती वन विभागाला मिळताच तातडीने वन विभागाचे अधिकाऱ्यांनी संतोष पाटील यांची भेट घेतली आणि सदर घटनेची माहिती मिळवली यानंतर वन विभागाने ज्या ठिकाणी घटना घडली त्या परिसरात सायंकाळी ड्रोन द्वारे परिसरात बिबट्या असल्याची पाहणी करणार असल्याचे सांगितले .तर संतोष पाटील यांनी आपल्या संजय नगर येथील घराच्या परिसरात आणि रस्त्यावर अनेकदा बिबट्या व त्याची लहानशी बचडे पाहिल्याच्या घटना व जनावरांच्या वर कुत्र्यांच्या वर हल्ल्यांच्या घटना वारंवार वन विभागाला कळवले आहेत मात्र त्यांनीही याकडे कानाडोळा केला आहे .स्वतः संतोष पाटील यांच्या घरी सीसीटीव्ही फुटेजी अनेक वेळा टीव्ही चॅनेल वरती सुद्धा प्रसिद्ध झाले आहे मात्र याकडे वनविभाग वारंवार दुर्लक्ष करत आहेत . जनावरांच्या हल्ल्याच्या घटना अनेकदा घडले आहेत मात्र आज बिबट्याने माणसावर हल्ला केल्याने सर्वत्र घबराट पसरली आहे .त्यामुळे अनेक लोक शेतात जायला घाबरत आहेत याबाबत वन विभागाने तातडीने या परिसरातील बिबट्यांची व बिबट्याच्या बछड्यांची पिल्ले बंदिस्त करून योग्य ठिकाणी सोडावीत अशी मागणी होत आहे .संतोष पाटील यांच्या अचानक झालेल्या हल्ल्यात वेळ प्रसंगावधानाने त्यांनी आपला जीव वाचवण्यास यश आले मात्र हा बिबट्या पुढे कोणावरी हल्ला करू शकतो त्यामुळे अनेकांच्या जीवाला घोर लागला आहे .या घटनेची चर्चा आज सकाळपासूनच गावामध्ये होती तर काहींनी संतोष पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या गळ्यावरील जखमा पाहत हळहळ व्यक्त केली तर दुसरीकडे दुपारी दोन वाजल्यापासून एक बिबट्या काळवट क्षेत्रामध्ये विहिरीत पडल्याच्या अफवा पसरल्याने अनेक जणांनी बिबट्या पाहण्यासाठी विहिरीकडे धाव घेतली मात्र ही घटना अफवा असल्याने अनेकांना पहावयास मिळाले या घटनेचे गांभीरे ओळखून वन विभागाने परिसरातील व जुजारवाडी वाठार शाहूनगर कालवडे रस्ता तसेच शेतातील पानंद रस्ते या परिसरात असणाऱ्या उसाच्या क्षेत्रामध्ये अनेक बिबट्यांची पिल्ले अनेकांना रोजच पाहायला मिळत आहेत .त्यांचाही बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. याची गांभीर्याने वन विभागाने दखल घ्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे .

शेतीपंपासाठी दिवसा वीज उपलब्ध करा. 

मागील महिन्यापासून उंडाळे येळगाव व इतर परिसरातील बिबट्याच्या घटनेची वन विभागाने दखल घेऊन आणि वीज वितरण दखल घेऊन रात्रीची शेतीपंपासाठी दिली जाणारी वीज दिवसा नऊ ते पाच या वेळेमध्ये दिली जात आहे .मात्र काले गावांमध्ये व काले परिसरातील गाव मध्ये अनेक बिबट्यांच्या घटना सतत घडत आहेत .याकडे वन विभाग व वीज वितरण कंपनी जाणून-बुजून दुर्लक्ष करत आहे तरी सध्याची घडलेली घटना त्याचे गांभीर्य ओळखून 1 जानेवारी 2026 पासून परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी सकाळी नऊ ते पाच या वेळेत वीज उपलब्ध करून द्यावी याबाबत लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन वीज वितरण कंपनीला देण्यात येणार आहे त्यामुळे वीज वितरण कंपनीने तातडीने हा निर्णय एक तारखेपासून लागू करावा अशी मागणी शेतकरी करत आहेत.

Janmat news
Author: Janmat news

मराठी न्यूज ब्रीफिंग

Read More