चाफळ (प्रतिनिधी) :- न्यू इंग्लिश स्कूल, नाणेगाव (खुर्द) च्या प्रांगणात दहावीच्या बॅचचा ३१ वर्षानंतर ऋणानुबंध सोहळा संपन्न झाला. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित, न्यू इंग्लिश स्कूल, नाणेगाव खुर्द या शाळेतील दहावीच्या १९९३-९४ च्या बॅचच्या मुलांनी एकत्र येत गेट टूगेदर ऋणानुबंध सोहळा आयोजित केला होता, तब्बल ३१ वर्षानंतर ही मुले एकत्र आली. 
ऋणानुबंध सोहळा यशस्वी करण्यासाठी मुलांनी खूप मेहनत घेतली हे करत असताना सर्वांना एकत्र आणण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले पहिली अडचण म्हणजे ३१ वर्षानंतर अनेक मूले वेगवेगळ्या शहरात स्थलांतरीत झाली असल्याने त्यांना संपर्क साधणे कठीण काम होते सर्व परिस्थितीवर मात करत गेट टूगेदर ऋणानुबंध सोहळा उत्साहात संपन्न झाला. 
कार्यक्रमाची सुरुवात ३१ वर्षापूर्वी शाळेतील माजी शिक्षक यांच्या स्वागताने पुष्पवृष्टी करत झाली, मान्यवरांकडून सरस्वती मातेचे पूजन व दीप प्रज्वलन केले. या प्रसंगी शाळेचे माजी शिक्षक कापसे सर, कोडांवले सर, जाधव सर तसेच शाळेचे मुख्याध्यापक पानस्कर सर शाळेचे माजी विद्यार्थी व केंद्रप्रमुख अर्जुन पाटील सर,संकपाळ सर, खंडाइत सर, कडव सर यांचे स्वागत शाल, श्रीफळ व छत्रपती शिवाजी महाराज यांची फ्रेम देऊन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय मोरे यांनी केले यामध्ये कार्यक्रमाचा उद्देश व शाळेसाठी मदत व जून्या आठवणी यांना एकतीस वर्षानंतर उजाळा दिला यानंतर विद्यार्थ्यांकडून आपली मनोगते सांगितली तसेच सर्व विद्यार्थ्यांकडून शाळेसाठी पंचविश हजार रुपयांचा इन्व्हटर भेट देण्यात आला व शाळेसाठी भविष्यातही मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले तसेच माजी शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना आपल्या मनोगतात व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला व शाळेसाठी हातभार लावण्यासाठी सांगितले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून स्मृतिचिन्ह म्हणून छान ट्राफी देण्यात आली व शेवटी फोटोसेशन झाले व स्नेहभोजन करून कार्यक्रमाची सागंता करण्यात आली.
याप्रसंगी कार्यक्रमाची सुरुवात शंकर सुतार यांच्या मधूर गायनाने व संस्थेच्या प्रार्थनेने झाली, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादासाहेब सूतार व प्रशांत पाटील यांनी केले व कार्यक्रमात रंग भरला. कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी रामचंद्र तोरस्कर, धनाजी पाटील, अरविंद कडव, दादासाहेब सुतार, बापूराव खराडे, प्रशांत पाटील, विजय मोरे,प्रकाश झोरे या माजी विद्यार्थ्यांकडून विशेष सहकार्य झाले.
याप्रसंगी माजी शिक्षक श्री. कापसे सर,श्री.कोडांवले सर,श्री जाधव सर, शाळेचे मुख्याध्यापक श्री. पानस्कर सर, माजी विद्यार्थी व केंद्रप्रमुख अर्जुन पाटील सर,दैनिक पुढारीचे वार्ताहर राजेंद्र साळुंखे गावातील जेष्ठ नागरिक शंकर पाटील आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते प्रकाश झोरे यांनी आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता झाली.






