वस्तू प्रमाणे आमदार, मंत्री विकले जातात हे मागील अडीच वर्षात पाहिले : अमोल कोल्हे.

वस्तू प्रमाणे आमदार, मंत्री विकले जातात हे मागील अडीच वर्षात पाहिले : अमोल कोल्हे. 

  • पाटण (प्रतिनिधी) :- पाटण येथे ‘शिवस्वराज्य’ यात्रेची महासभा पार पडली. यावेळी पाटण मतदारसंघात परिवर्तन घडवून आदरणीय खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार करण्यात आला.

    पाटण तालुक्यातील जनतेला संबोधित करताना मा.सत्यजित पाटणकर.

पाटण तालुक्यात शिवस्वराज्य यात्रा आली असताना युवा वर्गात मोठा उत्साह पाहिला मिळाला. पाटण मध्ये भव्य बाइक रॅली काढण्यात आली व कार्यक्रमाला सुरुवात झाली यावेळी घोषणांनी संपुर्ण पाटण परिसर दणाणून गेला. सध्याचे आमदार व मंत्री यांनी गावागावात बॅनर लावून विकास दाखवण्याचा प्रयत्न केला आहे परंतु पाटणकर कुटूंबावर असणाऱ्या विश्वासापूढे तो फिका पडत असल्याचे चित्र उपस्थित तालूकावासियांच्या गर्दीत दिसत होते.आता खऱ्या अर्थाने विधानसभेच्या लढाईला सुरूवात झाली आहे असे बोलताना सत्यजित पाटणकर यांनी तयारीला लागा असे पाटण तालुक्यातील जनतेला सुचित केले.पाटण तालुक्यात सामान्य लोकांना दडपशाहिला तालुक्यातून हद्दपार करायचे असेल तर मला साथ द्या असे आवाहनही जनतेला केले. याप्रसंगी राष्ट्रवादीत शरदचंद्र पवार पक्षाचे स्टार प्रचारक मा. अमोल कोल्हे यांनी उपस्थितांची मने जिंकली, बाजारात वस्तू विकल्या जातात पण मागील अडीच वर्षांत आमदार, मंत्री विकले जातात हे पाहीले अशी तिखट प्रतिक्रया दिली.

तसेच तालुक्यातील विकासाची गाडी योग्य मार्गावर आणायची असेल तर सत्यजित पाटणकर यांच्याशिवाय तालुक्याला पर्याय नाही,पुढचे सरकार महाविकास आघाडीचेच असेल त्यामध्ये पाटण तालुक्यातील उमेदवार असला पाहीजे असे आवाहन मा. जयंत पाटील यांच्याकडून करण्यात आले.

या शिवस्वराज्य यात्रेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.आ.जयंत पाटील साहेब, राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर, मा.खा. अमोल कोल्हे, माजी पालकमंत्री मा.आ. बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष मा.मेहबूब शेख, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, पंडित कांबळे, जिल्हाध्यक्ष सुनील माने, मा .तेजस शिंदे, माजी शिक्षण सभापती राजेश पवार, पाटण अर्बन बँक चेअरमन बाळासाहेब राजेमहाडिक, खरेदी विक्री संघाचे चेअरमन ॲड. अविनाश जानुगडे, उद्योजक याज्ञसेन पाटणकर , संजीव चव्हाण, नगराध्यक्षा सौ. मंगल कांबळे, सौ. स्नेहल कदम जाधव, रेखाताई पाटील, शंकर शेडगे, गुरूदेव शेडगे, निवासराव पाटील आदी मान्यवर, राज्यासह जिल्हा व पाटण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते,तरुण वर्ग मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

Janmat News
Author: Janmat News

Read More