झापूक झूपुक करत सुरज चव्हाण ने जिंकला बिग बॉस फाइनल.

मुंबई : बिग बॉस मराठीची क्रेझ यंदाच्या सीझनमध्ये अगोदरच्या सिझन पेक्षा जास्त होती याचे कारण सुरज चव्हाण एका गरीब कुटुंबातील मुलामुळेच. यंदाचा सीझन तर खूपच खास ठरला. अनेक नवे बदल आणि नव्या स्पर्धकांच्या कल्ल्याने बिग बॉस मराठी 5 खूपच गाजला. अखेर प्रेक्षकांना ज्या क्षणाची प्रचंड आतुरता होती तो क्षण आलाच. बिग बॉस मराठी 5 च्या विनरचं नाव घोषित करण्यात आलं आहे. यंदाच्या बिग बॉस मराठी 5 चा विनर ठरला आहे सूरज चव्हाण

बिग बॉस मराठी 5 विजेता गोलीगत सूरज चव्हाण ठरला आहे. त्याचं नाव जाहीर होताच सोशल मीडियावर नुसता कल्ला पाहायला मिळतोय. प्रेक्षकांचाही आनंद गगनात मावेना झालाय. ज्या क्षणाची 70 दिवसांपासून प्रेक्षक आतुरतेने, श्वास रोखून वाट पाहत होते तो दिवस, ती वेळ अखेर आलीच. बिग बॉसची ट्रॉफी अखेर झापुक झुपूक सूरज चव्हाणकडे आली आहे.

सूरज चव्हाणचा गोलीगत पॅटर्न अखेर जिंकलाच. बिग बॉस मराठी 5 ची ट्रॉफी जिंकताच त्याच्यावर शुभेच्छा आणि कौतुकांचा वर्षाव होत आहे. बिग बॉसच्या घरात सुरुवातीला त्याला गेम कळाला नाही खेळला मात्र हळू हळू त्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आणि प्रेक्षकांच्या मनात घर बनवलं. प्रेक्षकांचं मन जिंकून आणि जास्त वोटिंग मिळवून त्याने ही ट्रॉफीवर स्वतःचं नाव कोरलं आणि अखेर 70 दिवसांच्या शोचा राजा, विनर ठरला.

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी 5’ चा विनर कोण ठरणार? ट्रॉफी कोणाच्या नावे होणार याविषयी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा सुरू होत्या. प्रेक्षक आपापल्या आवडत्या स्पर्धकाला सपोर्ट करताना दिसून येत होते. मात्र ट्रॉफी नक्की कोण उचलणार यासाठी लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आजच्या फिनालेसाठी, विनरच्या घोषणेसाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते.

Janmat News
Author: Janmat News

Read More