कृषि महाविद्यालय, कराड महाविद्यालयाचा एन एस एस कॅम्प वनवासमाची येथे संपन्न.

कृषि महाविद्यालय, कराड महाविद्यालयाचा एन एस एस कॅम्प वनवासमाची येथे संपन्न. 

कराड ( प्रतिनिधी ) :- कृषी महाविद्यालय, कराड यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून वनवासमाची, कराड येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले व 2.5 किलो प्लास्टिक विद्यार्थ्यांकडून जमा केले.

कृषी महाविद्यालयाच्या एन एस एस कॅम्प च्या वतीने एका दिवसाचे स्वच्छता अभियान वनवासमाची येथे राबविण्यात आले यावेळी काॅलेजच्या विद्यार्थ्यांकडून गावामध्ये स्वच्छता करण्यात आली यामध्ये जवळपास 2.5 किलोग्राम इतके प्लॅस्टिक जमा करण्यात आले.

कराड कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी.

तसेच वडाच्या झाडाचे महत्व लक्षात घेऊन गावातील ग्रामस्थांकडून काॅलेजच्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने हायवे लगत असणाऱ्या वृक्षाचे गावात पून्हा वृक्षारोपण करण्यात आले तसेच इतर झाडांचे विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण करण्यात आले.

वडाच्या झाडाची पुनर्लावणी करताना गावातील ग्रामस्थ.

याप्रसंगी कृषी महाविद्यालय शिक्षक विद्यार्थी, वनवासमाची गावचे सरपंच उज्वला वाघमारे, उपसरपंच तुषार चव्हाण ,उत्तम यादव ,किशोर निंबाळकर प्रकाश चव्हाण,संतोष मदने,संदीप मदने, दिनकर मदने, महादेव सुळके ,श्रीकांत चव्हाण, दिगंबर जमदाडे, सुहास जमदाडे,अर्जुन चव्हाण, अमोल जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

Janmat News
Author: Janmat News

Read More