काले येथील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेचे मा. शरदचंद्र पवार यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ.

काले येथील शाळेचा रविवारी शरद पवार यांच्या                  हस्ते उद्घाटन समारंभ. 

  कराड : – काले ता. कराड येथील लोक सभागातून उभारण्यात आलेल्या महात्मा गांधी विद्यालयाच्या नुतन इमारतीचा उद्घाटन समारंभ रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते व विविध पदाधिकारी यांच्या उपस्थितीत रविवारी २२ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता संपन्न होत आहे. तरी या कार्यक्रमाला सर्व रयत शिक्षण प्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. काले येथे पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ४ आक्टोबर १९१९ मध्ये शिक्षणाचा श्रीगणेशा व रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून पहिले वसतीगृह सुरू केले. तर १ आँगस्ट १९४८ रोजी शाळेची स्थापना करण्यात आली. विद्यालयाच्या नूतन इमारतीचे बांधकाम लोकसहभागातून करण्यात आले आहे..राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने सुमारे एक कोटी रुपयांचा निधी शरदचंद्रजी पवार साहेब यांनी इमारत बांधकामासाठी दिला आहे . तसेच रयत शिक्षण संस्थेकडुन ५५ लाख रुपये , सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज कराड यांनी वीस लाख रुपये तसेच रयत शिक्षण संस्थेचे व महात्मा गांधी विद्यालयाचे आजी-माजी विद्यार्थी, रयत सेवक, शिक्षक, हितचिंतक व शालेय बाल गोपाळांनी आपल्या खाऊंच्या पैसे असे मिळून सुमारे ७२ लाखाचा निधी दिला आहे या सर्व निधीतून सुमारे 2 कोटी हून अधिक रकमेची भव्य दिव्य अशी शाळेची इमारत उभारण्यात आली आहे . २०१९ मध्ये बांधकामाला सुरुवात झाली होती. रविवारी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३७ व्या जयंतीनिमित्ताचे औचित्य साधून त्याच दिवशी विद्यालयाचे प्रांगणात दुपारी तीन वाजता संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या शुभहस्ते उद्धाटन सोहळा संपन्न होत आहे. संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. तसेच संस्थेचे संघटक डॉ.अनिल पाटील , माजी खासदार श्री निवास पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ ज्ञानदेव मस्के , संस्थेच्या व्हा.चेअरमन भगीरथ शिंदे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य खासदार रामशेठ ठाकूर, संस्थेचे सचिव विकास देशमुख , विभागीय चेअरमन संजीव पाटील यांच्यासह संस्थेचे विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. तरी सातारा जिल्ह्यातील रयत शिक्षण संस्थेचे सर्व आजी-माजी विद्यार्थी देणगीदार हितचिंतक यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन प्रभारी मुख्याध्यापक राजेंद्र नांगरे पाटील व स्थानिक स्कूल कमिटी, शाळा व्यवस्थापन समिती,शिक्षक पालक संघ, माता पालक संघ , सरपंच व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी केले आहे.

काले : येथे लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या महात्मा गांधीं विद्यालयाची भव्य दिव्य नुतन इमारत.

Janmat News
Author: Janmat News

Read More