मा.सत्यजित पाटणकर ( दादा ) यांची चाफळभागातील गणेश मंडळांना भेट.

चाफळभागातील गावातील ग्रामस्थांच्या अडचणी घेतल्या जाणून.

चाफळ (प्रतिनिधी) :-  मा. सत्यजित पाटणकर दादा (संचालक, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक) यांनी दर वर्षी प्रमाणे चाफळभागातील सर्व गावातील गणेश मंडळांना भेटी.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मा.श्री.सत्यजितसिंह पाटणकर दादा यांचा चाफळ पंचायत समिती गणातील श्री गणपती मंडळ गाव भेट दौरा आयोजित केला होता.

छायांकन, आठवण फोटोज, चाफळ.

या प्रसंगी दाढोली, मसुगडेवाडी ( दाढोली ) कोचरेवाडी, खोनोली, वाघजाईवाडी, मधलीवाडी, डेरवण, बहिरेवाडी, खराडवाडी, धायटी,पाडळोशी, केळोली,विरेवाडी, नाणेगाव, चाहूरवाडी, कवठेकरवाडी, चव्हाणवाडी, माथनेवाडी, चाफळ, बोर्गेवाडी, शिंगणवाडी, माजगाव.गावातील गणेश मंडळांना भेटी देत पक्षातील वरीष्ठ, वृद्ध कार्यकर्त्यांच्या घरी जावून तब्येतीची विचारपूस केली तसेच प्रत्येक गावातील ग्रामस्थांना भेट देत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली व संवाद साधला. यावेळी श्री. राजेश पवार (माजी सभापती जि. प सातारा), श्री. नथुराम झोरे (संचालक, पाटण अर्बन बँक), विजय मोरे (संस्थापक आरंभ चॅरिटेबल ट्रस्ट) श्री. आशिष पवार (सरपंच, ग्रा.पं. चाफळ), प्रा. शिरीष पवार, श्री. प्रमोद पाटील (सरपंच, ग्रा.पं. माजगाव), श्री. विनोद साळुंखे (माजी सदस्य, ग्रा.पं. चाफळ), श्री. काका पवार, श्री. रवी पाटील श्री.संग्राम यादव, जानु झोरे तसेच विभागातील प्रमुख पदाधिकारी व मंडळाचे पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला उपस्थित होते.

Janmat News
Author: Janmat News

Read More