उब्रंज-केळोली बसचा आपघात ; चालक नशेत, गाडी नाल्यात : सोळा प्रवासी थोडक्यात बचावले.
( चाफळ प्रतिनिधी ) :- उब्रंज-केळोली मुक्कामी बसचा चालकाच्या चूकीमुळे अपघात, बस नाल्यात, बस मधील सोळा प्रवासी थोडक्यात बचावले, प्रवाशांना किरकोळ दुखापत.

उब्रंज-केळोली मुक्कामी बस दिनांक ८ एप्रिल २०२४ रोजी रात्री ८च्या सुमारास केळोली (मसुगडेवाडी) या ठिकाणी नाल्यात जाऊन अपघात झाला. प्रवाशांकडून मिळालेल्या माहितीनुसार बस चालक याने चाफळ थांब्यानंतर बसने एका दूचाकीलाही धडक दिली त्यानंतर केळोली (मसूगडेवाडी) या ठिकाणी बस नाल्यात घातली, बस चालक याने मद्य प्राशन केल्याने हा अपघात झाला असे प्रवाशांकडून सांगण्यात आले. सदर अपघात झाला त्या ठिकाणी ग्रामस्थ जमा झाले असता, तुमची मुक्कामी बस बंद करतो अशी दमदाटी चालकाकडून करण्यात आली तरी चालकांवर कडक कारवाई व्हावी अशी ग्रामस्थांकडून मागणी होत आहे. बस मधील प्रवास करणारे प्रवाशी भयभीत झाले आहेत तरी याची दखल बस परिवहन विभागाकडून घेण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.






