नवी मुंबई येथे वाल्मिकी पठार लेझीम पथकाचा दुसरा वर्धापन सोहळा उत्साहात संपन्न.

नवी मुंबई ( प्रतिनिधी भाऊ जाईगडे ):- नवी मुंबई येथे वाल्मिकी पठार लेझीम पथकाचा दुसरा वर्धापन सोहळा उत्साहात संपन्न.

पाटण तालुक्यातील वाल्मिकी पठारावरील चाकरमान्यांनी मुंबई व नवी मुंबई येथे आपली पारंपारिक कला, लेझीम या खेळाचा गेल्या दोन वर्षांपासून करमणुकीसाठी वाल्मिकी लेझीम पथक निर्माण केले व या कालावधीत विविध सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेऊन आपले व आपल्या तालुक्याचे नाव मोठे केले आहे याच लेझीम पथकाचा रविवार दिनांक 10 डिसेंबर 2023 ला दुसरा वर्धापन दिन उत्साहात पार पडला या प्रसंगी पठारावरील सर्व लोक मोठया उत्साहात सामिल झाले वर्धापन दिन मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. वाल्मिकी पठाराचा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा संस्कृती जपणारा वाल्मिकी पठारावरील लेझीम पथकाचा दुसरा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या आनंदाच्या प्रसंगी वाल्मिकी पठारावरील लेझीम पथकातील सर्व खेळाडू उपस्थित होते कार्यक्रमास सर्वांनी उत्तम उपस्थिती दर्शविल वर्धापन दिनानिमित्त स्नेहभोजनाचा व सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता

सर्वांच्या उपस्थितीत कार्यक्रम अत्यंत आनंदात पार पडला.

Janmat News
Author: Janmat News

Read More