नाणेगावातील लोकांचा ४० वर्षाचा वनवास मा. ना. शंभूराज देसाई यांच्या सहकार्यातून संपला.

नाणेगावातील लोकांचा ४० वर्षाचा वनवास ना. शंभूराज देसाई यांच्या सहकार्यातून संपला.
चाफळ :- चाफळभागातील नाणेगावातील लोकांचा वनवास मा. ना. श्री. शंभूराज देसाई साहेब राज्य उत्पादन शुल्क मंत्री व पालकमंत्री सातारा व ठाणे जिल्हा यांच्या
आदेशानुसार संपला.
नाणेगावातील व मागासवर्गीय वस्ती पोहोच रस्ता तसेच पुढील ५-६ गावांना जोडणाऱ्या रस्त्याचे काम प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करून वाहतुकीस व वहीवाटीस खुले करून दिले त्या बद्दल नाणेगावातील ग्रामस्थ व तरुणांनी माननीय नामदार श्री. शंभूराजे देसाई साहेब यांचे व प्रशासनाचे आभार मानले.
मागील २५ ते ३० वर्ष नाणेगावातील व आजूबाजूला असणाऱ्या गावातील लोकांना खूप अडचणींचा सामना करावा लागत होता गावातील लोकांना व विद्यार्थ्यांना यामुळे खूप अडचणीं होत होत्या कारण गावातून बाहेर पडण्यासाठी रस्ताच उपलब्ध नव्हता कारण गावातील एका मातंग समाजातील व्यक्तीच्या शेतातून हा रस्ता जातो व त्या व्यक्तिकडे फक्त एकच शेत असल्याने त्यानेही गावाबरोबर तीव्र विरोध केला त्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला होता. हा रस्ता आडवल्यामूळे पावसाळ्यात ग्रामस्थ व विद्यार्थी यांची खूप अडचण होत होती त्यामुळेच हा विषय गावातील तरूणांनी मा. नामदार साहेब यांच्याकडे मांडला तेव्हा त्यांनी प्रशासनाला विशेष सूचना देऊन या रस्त्याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करा असे आदेश पारित केले व त्या प्रमाणे या रस्त्या मधील अडथळे दुर करून रस्ता वाहतूकीस खूला केला.

प्रशासनाकडून रस्ता वाहतुकीस खूला करताना प्रशासकीय आधिकारी.

या प्रसंगी मा. उप विभागीय अधिकारीसो श्री. सुनील गाडे व मा. तहसीलदारसो श्री. रमेश पाटील व आपल्या भागचे शिवसेना पक्षाचे नेते मा. श्री. भरतभाऊ साळुंखे अध्यक्ष – संजय गांधी निराधार योजना, DYSP पाटण श्री लावंड साहेब, मा. तहसीलदारसो श्री. रमेश पाटील, BDO श्री शेलार साहेब, सर्कल मा. गाडेसो, तलाठीसो, अधिकारी व कर्मचारी, मा. श्री चंद्रकांत पाटील संचालक शिवदौलत पथसंस्था, श्री प्रशांत पाटील – संचालक, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना, श्री राजेंद्र पाटील – संचालक बाजार समिती पाटण, श्री शिवाजी बोंगाणे (माझी सरपंच कडववाडी), श्री गोरख चव्हाण उपसरपंच माजगाव, श्री मनोहर कडव कडववाडी तसेच गावाचे उपसरपंच मा. श्री वैभव मुळगावकर, श्री. महेश पाटील श्री. धनाजी मोरे, श्री. राजदीप रोकडे श्री. नितीन रोकडे उपस्थित होते.

रस्ता खूला झाल्यावर रस्त्यावरून मार्गक्रमण करताना ग्रामस्थ.
Janmat News
Author: Janmat News

Read More