विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून साकारला वनराई बंधारा. न्यू इंग्लिश स्कूल, केळोली स्कूल मधिल विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम.

केळोली (प्रतिनिधी ):- विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून साकारला वनराई बंधारा, न्यू इंग्लिश स्कूल, केळोली शाळेतील शिक्षक, विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम. 

????वनराई बंधारे बांधले ????

न्यू इंग्लिश स्कूल केळोली विद्यालय परिसरातील ओढ्यावर शनिवार दिनांक: ७-१०-२०२३ रोजी वनराई बंधारे बांधण्याचा उपक्रम राबवण्यात आला.

श्रमदान करताना न्यू इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी. (छायांकन आठवण फोटोज, चाफळ)

विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी दिलेल्या सूचनांनुसार सिमेंटची टाकाऊ पोती एकत्र गोळा केली त्या मध्ये माती मुरूम खडे इ . खोरे व कुदळ,टिकाव यांच्या साहाय्याने भरले ओढ्याच्या प्रवाहात प्रथम मोठे दगड यांचा रुंद बांद तयार केला व त्यावर माती खडे मुरूम इ. भरलेल्या पोत्यांचे थर दिले अशा प्रकारे वनराई बंधारे तयार झाले यांच्या सहायाने केळोली परिसरातील पाणी आढवा व पाणी जिरवा मोहीम यशस्वी होईल सदर उपक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. जरग पी. बी. सर श्री.गुरव सर श्री. कुंभार सर श्री जाधव सर यांचे मार्गदर्शन मिळाले परिसरातील ग्रामस्थांनी हा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगितले.

Janmat News
Author: Janmat News

Read More