केळोली गावात भूताच्या दगडाची भिती.

केळोली ( प्रतिनिधी ) : – पाटण तालुक्यातील चाफळ भागातील केळोली गावामध्ये भूताच्या दगडामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण.

केळोली गाव हे पाटण तालुक्यातील डोंगरांच्या कुशीत वसले आहे याच गावातील लोक आज भितीच्या छायेत जगत आहेत याचे कारण बनलाय एक दगड. हा दगड गावात भूताच्या दगड म्हणून ओळखला जातो. याच दगडामुळे लोक भितीच्या छायेत जगत आहेत.

( दगडाची पहाणी करताना तलाठी व ग्रामस्थ. )

केळोली गावाला तिन्ही बाजूंनी डोंगर आहेत त्यामध्ये गावाच्या अगदी वरच्या बाजूला हा प्रचंड मोठा भूत्याचा दगड डोंगराच्या उतारावर मधोमध दुसर्‍या एका दगडावर विसावला आहे. केळोली हा भाग कोकण व घाटमाथा यांची सीमारेखा आहे त्यामुळे या ठिकाणी पावसाचे प्रमाण जास्त असते त्यामुळे दरडी कोसळत असतात. याच गावाच्या शेजारी असणारे बाटेवाडी गावालाही प्रशासनाकडून पावसाळ्यात तात्पुरत्या काळासाठी स्थलांतराचे आदेश दिले आहेत, अशा परिस्थितीत केळोली गावाच्या वरच्या भागात हा भूत्याचा दगड असल्याने व तीव्र उतारावर असल्याने हा दगड काढण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.तरी केळोली गावचे तलाठी कौठुळे मॅडम या मौजे केळोली येथे पीक पाहणी करण्यासाठी आल्या असता त्यांच्या ही बाब लक्षात आणून देण्यात आली त्यावर तलाठी मॅडम यांनी प्रांत साहेब व तहसीलदार साहेब यांना फोटो पाठवते व बोलते असे सांगितलं आहे.याप्रसंगी गावचे ग्रामस्थ उपस्थित होते तरी सरपंच श्री.काशीनाथ मोरे यांनी या गोष्टीचे गांभीर्य ओळखून लवकरात लवकर हा दगड हटवावा व पुढील अनर्थ टाळावा अशी मागणी प्रशासनाला केली आहे. या दगडाच्या बाजूला असणारी जमीन खचली असल्याने हा दगड कधीही गावावर पडू शकतो व मोठा अनर्थ घडू शकतो अशी ग्रामस्थांकडून भिती व्यक्त करण्यात आली आहे.याप्रसंगी गावचे तलाठी कौठुळे मॅडम, पोलीस पाटील दत्तात्रय चंदुगडे, प्रशांत मोरे, अंकुश मोरे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

Janmat News
Author: Janmat News

Read More