मराठा आंदोलन पेटल ; पोलीसांकडून लाठीचार्ज: चार बसेस पेटवल्या.

 मराठा आंदोलनाची ठिणगी पेटली. 

जालना : अंतरावाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. पोलिसांकडून आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मराठा आरक्षणासाठी गेल्या चार दिवसांपासून उपोषण सुरू आहे. आंदोलनस्थळी दगडफेक झाली त्यानंतर पोलिसांनी हवेतगोळीबार करण्यात आला.

गेल्या २९ ऑगस्टपासून मराठा मार्चा समन्वयक मनोज जरांगे यांच्यासह १० जण आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसले होते. आमरण उपोषण करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न पोलिसांकडून झाला. पण त्याला विरोध झाल्यानंतर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. तर आंदोलकांनी दगडफेक केली गेली. त्यानंतर आक्रमक आंदोलकांना शांत करण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. पोलिसांनी काल रात्रीच आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो हाणून पाडण्यात आला होता.

आंदोलकांकडून झालेल्या दगडफेकीत १० ते १२ पोलिस जखमी झाले आहेत. दरम्यान या घटनेनंतर धुळे-सोलापूर महामार्गावर काही वाहनांची जाळपोळ करण्यात आल्याचे वृत्त समोर येत आहे. या लाठीचार्जनंतर बीड बंदची हाक देण्यात आल्याचे वृत्त समोर आहे. मात्र अद्याप बंद बाबत अधिकृत माहिती समोर आली नाही.

संभाजीराजे छत्रपती यांची आक्रमक प्रतिक्रिया

अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संविधानिक मार्गाने आंदोलनास बसलेल्या आंदोनकर्त्यांना पोलिसांनी घेराव घालत अमानुष लाठीचार्ज केला व शांततेच्या मार्गाने आपले हक्क मागण्यासाठी जमलेल्या मराठा समाज बांधवांस पांगवण्यासाठी गोळीबार केला. हे कृत्य अत्यंत निंदनीय असून कुणाच्या आदेशाने हे सर्व घडले याचा गृहमंत्र्यांनी तात्काळ खुलासा द्यावा, अन्यथा तुम्हाला समाजाच्या रोषास सामोरे जावे लागेल. मराठा समाजाला दिलेल्या या अमानुष वागणूकीमुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वथा राज्याचे गृहमंत्री व सरकार जबाबदार असेल.

Janmat News
Author: Janmat News

Read More