महाराष्ट्र :- संभाजी भिडे गुरूजी यांनी केलेल्य वादग्रस्त वक्तव्यावर अमरावतीमधील राजापूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संभाजी भिडे गुरूजी नेहमी काहीना काही वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत येतात. सध्याच्या त्यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात असंतोषाची लाटच पसरली आहे, संपूर्ण जगाला अहिंसेच्या मार्गची शिकवण देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी बद्दलचे वादग्रस्त विधान चर्चेत आहे.यावर आक्षेप घेत कॉग्रेसकडून तक्रार दाखल करत अटक करण्याची मागणी केली आहे.
भिडे गुरूजींनी काय विधान केले?
मा. गांधी यांचे वडील एका जमिनदाराच्या घरी कामाला होते व त्यांनी चोरी केली व पळून गेले व जमीनदाराने त्यांच्या पत्नीस आपल्याकडे ठेवले.
या विधानामूळे महाराष्ट्रात असंतोषाची लाट पसरली आहे व ठिकठिकाणी निषेध व्यक्त होत आहे. अशातच आता अमरावतीत त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे गुन्ह दाखल करण्यात आला आहे. 
सरकारकडून काय भूमिका.
महाराष्ट्र सरकारकडून याबाबत सत्यता पडताळून निर्णय घेण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.






