‘देवता’ फेम अभिनेते रवींद्र महाजनी यांचा दोन दिवसापूर्वी पुणे-आंबी येथे राहत्या घरात मृत्यू.

मराठी चित्रपट अभिनेता रवींद्र हनुमंत महाजनी यांचे निधन. मराठी चित्रपट सृष्टीत मोलाचे योगदान दिलेले देवता चित्रपट फेम रविंद्र महाजन यांचे आंबी तालुका मावळ हद्दीतील एक्झर्बिया सोसायटीमध्ये मृत अवस्थेत आढळून आले. ही घटना शुक्रवार दिनांक 14 रोजी सायंकाळी चार वाजता उघडकिस आली. त्यांचा मृत्यू तीन दिवसांपूर्वी झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांचे वय मृत्यू समयी 77 वर्ष असल्याचे सांगण्यात येते. रवींद्र महाजनी यांनी हिंदी मराठी चित्रपट भूमिका केली आहेत. त्यात देवता, मुंबईचा फौजदार, लक्ष्मी, झुंज, हळदी कुंकू, गोंधळ गोंधळ अशा चित्रपटांचा समावेश आहे. पोलिसांच्या माहितीनुसार त्यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया झाली होती गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून ते या फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होते. त्यांचा मुलगा गश्मीर महाजन हे मुंबईत राहायला असतात.अशा त्यांच्या मृत्यूमुळे सगळीकडे हळ हळ व्यक्त होत आहे.

Janmat News
Author: Janmat News

Read More