कराड येथे ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटास तुफान गर्दी.

जुलै 12 कराड (प्रज्ञा पाटील) :- कराड येथे  “बाईपण देगा देवा” या मराठी चित्रपटाला महिलांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.   माहेरची साडी,चिमणी पाखर या चित्रपटांनंतर प्रथमच या चित्रपटाची क्रेज महिला वर्गात पहायला मिळत आहे.   

तुझ्या हाती जगा उद्धाराची रित” केवळ पाळण्याची दोरी घेवून जग उद्धार करणारी सध्याची स्त्री राहिली नाही. अनुभव घेऊनही स्त्री ही आपल्या भूमिका उत्तरात शोधत असते याची प्रचितीच म्हणजे चित्रपटाला  असणारी तुफान गर्दी सर्व कर्तव्य नाती, व्यवहार कसा संभाळावा याचा प्रत्यक्ष दृष्टांत म्हणजे ‘ बाईपण भारी देवा”हा चित्रपट आहे. या दगदगीच्या जीवनात महिलांना दररोज तारेवरची कसरत करावी लागते पण कुटुंबातील सदस्य मात्र सोयिस्कर रित्या त्यांच्याकडे व त्यांच्या भावभावनांचे दुर्लक्ष करतात व त्यामुळेच आपले आयुष्य कसे जगायचे याची मांडणी छान प्रकारे चित्रपटात सादर केली आहे त्यामुळेच महिला वर्गात या चित्रपटाची क्रेज निर्माण झाली आहे.

कराड-पाटण पंचक्राशीतून या चित्रपट्टाला तुफान गर्दी आहे महिलांची संख्या जास्त आहे, पण याची यामध्ये तीला समजावून घेणाऱ्या पुरुषांची गर्दी चित्रपटास जास्त व्हायला हवी आणि हीच तर समाजाची गरज आहे..

Janmat News
Author: Janmat News

Read More