मुबंई :- ‘ बवाल ’ चित्रपटात वरुण धवन आणि जान्हवी पती-पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहेत. अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित केलेल्या ३ मिनिटे ३ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना वरुण-जान्हवीच्या गोड प्रेमकहाणीत थरारक ट्विस्ट आल्याचे पाहायला मिळेल. वरुण धवन आणि जान्हवी कपूर या दोघांनाही पहिल्यांदाच ‘बवाल’च्या निमित्ताने एकत्र काम केले आहे. चित्रपटात जान्हवी कपूरने ‘निशा’, तर वरुण धवनने ‘अजय’ ही भूमिका साकारली आहे.
https://youtu.be/NyeG2mLVCS4
ट्रेलरमध्ये सुरुवातीला वरुण धवन एका इतिहास शिक्षकाची भूमिका साकारताना विद्यार्थ्यांना चुकीचा इतिहास शिकवत असल्याचे दाखवण्यात आले आहे. पुढे त्याचे लग्न होते आणि दोघेही फिरायला युरोपला जातात. यानंतर गोष्टी कशा बदलतात तसेच दुसरे महायुद्ध आणि हिटलरचे शहर याचा वरुण-जान्हवीच्या प्रेमकथेशी काय संबंध आहे याचा उलगडा २१ जुलै २०२३ रोजी होणार आहे. अॅमेझॉन प्राइम व्हिडीओने ट्रेलर शेअर करत “प्रेम ते ‘बवाल’पर्यंतचा प्रवास!” असे कॅप्शन दिले आहे. ‘बवाल’ चित्रपटाच्या निमित्ताने वरुण धवन आणि जान्हवी कपूरची नवी ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २१ जुलैला ‘बवाल’ अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर होईल.
Author: Janmat news
मराठी न्यूज ब्रीफिंग






