तुकाराम महाराजांच्या 333व्या आषाढी वारीची जय्यत तय्यारी.

कराड :- या वर्षी ही आषाढी वारीसाठी तुकोबारायांची पालखी सजवायचं काम लय जोशात चाललंय. या वर्षी वारीचा ३३३ वा पालखी सोहळा आहे.
देहूतल्या देऊळवाड्यात “तुकोबारायांच तशी लोकांची जातीभेदानं-धर्मद्वेषानं काळवंडलेली मनं घासूनपुसून स्वच्छ करण्याचं साधन कुठलं असेल, तर ते जगतगुरु तुकोबारायांचे अभंग “जाईन ग माय त्या पंढरपूरला भेटेन माहेरा अपुलीया नाम घेता वाट चाले यज्ञ पाऊला पाऊले ” अगदी मन तृप्त करून टाकतात., तसेच इकडे साऱ्या विश्वाची माऊली ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मंदीराचा कळस डोलतांच  विठू माऊलीच्या जयघोषात सर्व वारकरी संप्रदाय दिंंड्या पताके , तुळशी , विठ्ठल – रूक्मिणीची मूर्ती डोही घेऊन पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होत असताना दिसत आहे. दिंड्या निघण्याचा तारीख शुक्रवार ९ जून २०२३ तर दिंड्या परतीची तारीख मंगळवार ३० जून २०२३ ही असणार आहे.
जगतगुरु संत तुकाराम महाराज पालखी आणि माऊली ज्ञानेश्वर महाराज पालखी तसेच सर्व पालख्या , दिंड्या सोमवारी दि.१२ रोजी पुण्यामध्ये दाखल झाल्या पुण्यात आल्यानंतर जिकडे-तिकडे औषधांचे स्टाॅल , फिरता दवाखाना , मोफत ऑम्बुलन्स , भोजनास पंचपक्वान , उपवासाचे फराळ व फळे भरपूर प्रमाणात वाटप केले जाते आणि सर्व व्यवस्था पाहुणचार पद्धतीने केली जाते ., म्हणतात ना ‘पुणे तिथे काय उणे ‘ “साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा ” दोन दिवसांच्या मुक्कामानंतर बुधवारी १४ रोजी सर्व वारकरी पंढरीच्या दिशेने वाटचाल करतात . तुकाराम महाराजांच्या सोलापूर रोड मार्गे तर ज्ञानेश्वर माऊलींची सासवड , जेजुरी मार्गे दिंड्या पंढरीच्या दिशेने प्रस्थान करत असतात. पोलिस प्रशासन तसेच पोलिस मित्र यांचा कडेकोट बंदोबस्तात रात्रंदिवस सहवास लाभलेल्या असतो.
“पाऊले चालती पंढरीची वाट सुखी संसाराची सोडूनिया गाठ” हे गीत गात विठ्ठल रखुमाई , ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारामच्या जयघोषात तल्लीन होऊन पायी हळूहळू चाला मुखाने हरी नाम बोला , टाळ , पखवाज वाजवत दिंड्या पताके घेऊन अनंत काळापासून चालत आलेली परंपरा जोपासत पायी चालत वारी करत असतात. खरं तर नारायण महाराज तुकाराम महाराजांचा तिसरा मुलगा यांनी इ.स.१६८५ साली पहिली वारी सुरू केली. त्यावेळी त्यांनी आळंदी हून ज्ञानेश्वर महाराजांची आणि देहूतून तुकाराम महाराजांच्या पादुका घेऊन पंढरपुरला गेले होते. सध्याच्या वारीची रचना हैबतबाबा यांनी केली होती.,ते सातारचे आरफळ गावचे देशमुख होते.

Janmat News
Author: Janmat News

Read More