पावसाळ्यापूर्वी सांडपाण्याचा निचरा करा ; बनवडी ग्रामस्थांची मागणी

कराड,(प्रतिनिधी)

बनवडी (ता. कराड) येथील साईप्रसाद वर्धन प्राईड व साईतिर्थ सहकारी सोसायटीमध्ये सांडपाण्याचा निचरा मोठ्या प्रमाणावर होत आहे. याबाबत बनवडी ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रार करूनही त्यांच्याकडून दुर्लक्ष होत आहे. येत्या पावसाळ्यापूर्वी या सांडपाण्याचा निचरा करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा या सोसायटीतील नागरिकांच्यावतीने देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांना देण्यात आले आहे.
देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, साईप्राईड व साईतिर्थ सहकारी सोसायटीमध्ये आम्ही गेली १२ ते १५ वर्षापासून वास्तव्यास आहोत.
परंतु, पूजा सहकारी सोसायटीवरून खाली येणारे सांडपाणी पावसाळ्यात आमच्या सोसायटीमधील पार्किंगमध्ये २ फुटापर्यंत साचून राहते. त्यामुळे या सांडपाण्याचा आम्हास खुप त्रास सहन करावा लागत आहे. त्यापासून होणाऱ्या रोगराईचा दरवर्षी आम्हास सामना करावा लागत आहे.

Janmat News
Author: Janmat News

Read More