नऊ वर्षांची चिमुरडी, शाळेत जाताना पळवलं अन् दगडाच्या खाणीत…, सोलापूरच्या नराधमाला जन्माची अद्दल.
सोलापूर: अवघ्या 9 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या 25 वर्षीय नराधमाला न्यायालयाने जन्माची अद्दल घडवली. सोलापूर जिल्हा न्यायालयाने बापू सिद्धप्पा कुसेकर (रा. अक्कलकोट) याला मृत्यू होईपर्यंत तुरुंगवास आणि एकूण 71 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सन 2014 मध्ये पीडित मुलगी 9 वर्षांची असताना कुसेकर याने जबरदस्तीने पळवून नेत अत्याचार केले होते. याप्रकरणी आईने अक्कलकोट पोलिसांत धाव घेतली होती.
Author: Janmat news
मराठी न्यूज ब्रीफिंग
Post Views: 89






