काले (कराड) :- काले कालवडे रस्त्यावरील कालवडे चा माळ शिवारात आज पहाटे 4:15 च्या सुमारास सुभाष यादव या शेतकऱ्याच्या वस्तीवरील बिबट्याने कुत्र्यावर हल्ला करून त्याला ठार केले सदर घटना त्यांनी लावलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. 
काले व परिसरातील शिवारात नेहमीच बिबट्याचे दहशत शेतकऱ्यांना पहावयास मिळते याच परिसरात सुळाचा डोंगर आगाशिव डोंगर तसेच लहान मोठे टेकडे आहेत त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात बिबटे व त्याची पिल्ले इकडून तिकडे फिरताना पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर बिबट्यांना खायला अन्न नसल्याने ते जनावरांच्या गोठ्यातील लहान गुरे वासरे कुत्री यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार मारत आहेत अनेकांची या परिसरातील शेतकरी शेतामध्येच घर बांधून वस्तीस आहेस त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांनी शेतीबरोबर पशुपालन हा जोड व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये सुरू केला आहे काले येथील शेतकरी सुभाष यादव व त्यांचे चुलत बंधू रंजीत यादव यांचे या परिसरात 100 व अधिक जनावरे आहेत व तो मुक्त गोठा असल्याने या परिसरात ते नेहमीच वस्तीस असतात आज पहाटे 4:15 च्या सुमारास गाईंचा हंबरण्याचा व कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज कानी पडल्यानंतर सुभाष यादव हे जागे झाले मात्र त्यांनी गोठ्याला सीसीटीव्ही कॅमेरे लावल्यामुळे नेमका आवाज कशामुळे झाला व गाई म्हशी का ओरडत आहेत हे त्यांनी सीसीटीव्ही मध्ये पाहिले तर त्यांना गोठ्यामध्ये बिबट्या निदर्शनास आले व त्यांनी पाळलेले दोन कुत्र्यांपैकी एक कुत्रे त्या बिबट्याने अलगत उचलून नेऊन ठार केले हे सीसीटी मध्ये पाहिल्यानंतर त्यांनी मोठमोठ्याने आवाज करून बिबट्याला करण्याचा प्रयत्न केला व तो लगेचच उसामध्ये पळून गेला सदर घटनेची चर्चा गावभर व परिसरात पसरली त्यामुळे या परिसरात खूपच भीतीचे वातावरण आहे परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस तोडणी साठी उभा असून बिबटे व त्यांची बचडे या परिसरात या उसांचा आसरा घेत आहेत त्यामुळे या परिसरातील शेतकरी शेतातील जायला घाबरत आहेत या घटनेची सविस्तर माहिती मिळताच वन विभागाचे अधिकाऱ्यांनी सुभाष यादव यांना व घटनास्थळी भेट दिली व सविस्तर माहिती जाणून घेतले व बिबट्यापासून सावध राहण्यासाठी त्यांनी स्वतः सावधगिरी बाळगणे असा सल्लाही दिला या परिसरात वावरणारे बिबट्या व तिची पिल्ले यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी या परिसरात शेतकरी करत आहेत.
Author: Janmat News





