Janmat News

“विठ्ठल रूकमाई” च्या नामघोषात दिंडी सोहळा उत्साहात संपन्न.

केळोली ( प्रतिनिधी) : – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व न्यू इंग्लिश स्कूल केळोली नं. १ तालुका पाटण येथे आषाढी एकादशी निमित्त बाल गोपाळांची सुंदर वेषभूषा करून दिंडी काढण्यात आली.

आषाढी एकादशी निमित्त जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ व न्यू इंग्लिश स्कूल, केळोली यांनी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते. या दिंडीत शेकडो विद्यार्थी ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ व ‘विठ्ठल, विठ्ठल विठ्ठला’ या नामघोषाणे टाळ, मृदुंग, विणा, ढोल ताशाच्या गजरात तल्लीन होऊन सहभागी झाले होते. त्याचबरोबर केळोलीतील ग्रामस्थही मोठ्या उत्साहात या दिंडी सोहळयात सहभागी झाले होते. ही दिंडी आजच्या धावपळीच्या युगात देखील माणुसकीचे दर्शन देत होती. दिंडीतील सहभागी विद्यार्थी व ग्रामस्थ,महिलावर्ग चालीतील अभंग, फुगडी, रिंगण सोहळ्यात पावसाची तमा न बाळगता विठ्ठल, रूकमाई नामघोषात तल्लीन झाले होते.

छायांकन:- आठवण फोटोज, चाफळ
दिंडी सोहळयात सहभागी विद्यार्थी.

 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व न्यू इंग्लिश स्कूल केळोली नं.१ तालुका पाटण येथे आषाढी एकादशी निमित्त बाल गोपाळांची सुंदर अशी दिंडी सोहळा आयोजित करण्यात आली.

यासाठी विद्यार्थ्यांकडून विठ्ठल व रुक्माई यांची सुंदर वेशभूषा करण्यात आली होती.

जिल्हा परिषद शाळा केळोली नंबर एक व न्यू इंग्लिश स्कूल केळोली येथील विद्यार्थ्यांनी या दिंडी सोहळ्यामध्ये सहभाग घेतला. ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोषामध्ये त्यांनी दिंडी काढली. तसेच दोन्ही शाळेच्या शिक्षकांनीही या दिंडी सोहळयात उत्साहाने भाग घेतला.

जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक … श्री सोमनाथ पोतदार सर. सहकारी शिक्षक वृंद… अमृता केदारी मॅडम,आरती घोडे मॅडम ,श्री संजय कोळी सर.

न्यू इंग्लिश स्कूल केळोली चे मुख्याध्यापक… श्री प्रल्हाद जरग, श्री कुंभार सर श्री गुरव सर श्री जाधव सर श्री मोरे सर. तसेच कर्मचारी श्री चव्हाण हे सर्व उपस्थित होते यासोबत अंगणवाडी ताई, सरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य युवा वर्ग. व ग्रामस्थ उपस्थित होते.

Rahul Waghmare
Author: Rahul Waghmare