केळोली ( प्रतिनिधी ) :- पाटण तालुक्यातील चाफळभागातील केळोली – पाठवडे परिसरात बिबट्याकडून अनेक शेतकऱ्यांच्या शेळ्या फस्त शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त वनविभागामार्फत तात्काळ दखल घेऊन लवकरात लवकर शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देण्याची मागणी.
नागरिकांमध्ये भितीचे वातावरण ; बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी.

बिबट्याकडून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या जनावरांवर हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे अगोदरच माकडे, वानरे, रानटी डुक्कर, मोर, साळींदर या प्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे खुप नुकसान होत आहे त्यामध्येच शेतकऱ्यांच्या जनावरांची बिबट्याकडून शिकार होत असल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. पाठवडे येथील रामचंद्र भैरू झोरे व इतर पाच शेतकऱ्यांच्या शेळ्या बिबट्याकडून सावज झाल्या आहेत त्याचबरोबर केळोलीतील अशोक विठ्ठल मोरे यांचीही शेळी बिबट्याकडून फस्त करण्यात आली असून वनविभागाने तात्काळ दखल घेऊन लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी व रानटी श्वापदांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.






