प्रशासनाच्या अनास्थेमुळे केळोली – विरेवाडी संपर्क तूटला.
चाफळ, जूलै :- पाटण तालुक्यातील चाफळभागातील विरेवाडी घाटरस्ता दरडी कोसळल्याने संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रशासनाकडून बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पाटण तालुक्यातील चाफळभागातील चाफळ – केळोली- विरेवाडी – वाघापूर या रस्त्याची सर्वात जूना रस्ता म्हणून ओळख आहे.हा रस्ता चाफळभागातील लोकांना तालुक्यास जाण्यासाठी सूकर आहे तसेच हाच रस्ता तारळे भागालाही जोडतो त्यामुळेच या रस्त्याला भागात विशेष महत्व आहे. मात्र मागील अनेक वर्षांपासून या रस्त्याची डागडूजी करण्यात आली नाही.
भागातील लोकांकडून वारंवार मागणी करूनही प्रशासनाने लक्ष न दिल्यामुळे सद्यस्थितीत घाटरस्ता बंद करण्याची वेळ आली आहे त्यामुळे विरेवाडी या गावचा चाफळभागाशी संपर्क तुटला आहे.तसेच विरेवाडीतून शाळेसाठी केळोलीतील हायस्कूलमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांवर शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे त्यामुळेच समाजामधून संताप व्यक्त होत आहे.जर रस्ता वाहतूक लवकरात लवकर दुरूस्ती करून पूर्ववत केली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा पवित्र्यात केळोली सरपंच, विरेवाडी सरपंच, पाठवडे सरपंच व सर्व गावचे ग्रामस्थ आहेत असे सांगण्यात आले.
मागील काही महिन्यात सातारा जिल्ह्याचे मा. खासदार श्रीनिवास पाटील साहेब यांच्याकडून पाठपुरावा करून पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत रस्ता मंजूर झाला मात्र प्रशासनाकडून कोणतीच हालचाल झाली नसल्यामुळे रस्ताचे काम होऊ शकले नाही असे केळोलीचे सरपंच यांच्याकडून सांगण्यात आले.






