रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीवर डोंगर कोसळला ; ५ जनांचा मृत्यू व १०० जन दबल्याची भिती.

रायगड 20 जूलै :-  रायगड जिल्ह्यातील ईशालवाडी गावावरती रात्री डोंगर कोसळला. ५ जनांचा मृत्यू व १०० जन गाडल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

बचावकार्य करण्यासाठी जात असताना एकाचा मृत्य. 

काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील  माळीन गावावर डोंगर कोसळून अनेक लोकांचा मृत्य झाला होता.अशीच घटना महाराष्ट्रात आज रात्री दोन वाजण्याच्या सुमारास रायगड जिल्ह्यातील ईशालवाडीत घडली.  गावावर काळाने घाला घातला व गाढ झोपेत असलेल्या निष्पाप लोकांचा बळी गेला.या घटनेत ५ जनांच  मृत्यू व १०० जन गाडल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंतर बचाव कार्य करण्यासाठी जात असताना एकाचा मृत्यू झाला आहे.

दाट धुके व मुसळधार पावसामुळे मदत कार्यात अडथळा. 

दोन दिवसांपासून या भागात मुसळधार पाऊस व दाट धुक्यमुळे मदत कार्यात अडथळा निर्माण होत आहे.

Janmat News
Author: Janmat News

Read More