नवी मुंबई (प्रतिनिधी) :- गुरुकुल कॉन्व्हेंट स्कूल, कोपरखैराणेच्या च्या विद्यार्थ्यांकडून ढोल ताशांच्या गजरात, विठू माऊलीच्या जयघोषात आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा उत्साहात संपन्न.

दर वर्षी प्रमाणे याही वर्षी आपली परंपरा राखत गुरुकुल कॉन्व्हेंट स्कूल, कोपरखैरानेच्या विद्यार्थ्यांकडून दिंडी सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. ढोल ताशांच्य गजरात लेझीम खेळत विठू माऊलीच्या जयघोषात, टाळ, मृदंग च्या तालावर सेक्टर 17 येथून दिंडी सोहळ्याला सुरूवात करण्यात आली व सेक्टर 17 चे विठ्ठल रूकमाई च्या मंदिरात दर्शन घेऊन दिंडी सोहळ्यची सांगता करण्यात आली. यावेळी मुलांनी पारंपारिक पोषाख परिधान करून उत्साहात दिंडी सोहळयात भाग घेतला होता.या प्रसंगी शाळेचे संस्थापक अध्यक्ष विजय जाईगडे सर, कविता मॅडम, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग तसेच स्थानिक रहिवाशी व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
Author: Rahul Waghmare





