वारकऱ्यांची व महाराष्ट्राची माफी मागा नाहीतर पंढरपुरात पाय ठेऊ देणार नाही : संजय राऊत

मुंबई  :- वारकरी संप्रदाय यावरील पोलीसांकडून झालेला लाठीचार्ज  महाराष्ट्र कधिच खपवून घेणार नाही.वारकऱ्यांवरील हल्ला हा महाराष्ट्राच्या संस्कृतीवरील आणि अस्मितेवरील हल्ला आहे. पंढरीच्या वारीचा संपूर्ण जगात सन्मान केला जातो. नियोजन, संयम, शांतता आणि शिस्त असणाऱ्या वारीवर हल्ल्याचा समाजातील सर्व स्तरातून निषेध होत आहे.आता यांना विठ्ठलाची महापूजा करण्याचा अधिकार नाही. सरकारने आधी वारकऱ्यांची आणि महाराष्ट्राची माफी मागायला हवी. वारकऱ्यांची संस्कृती हि महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्यामुळे माफी मागितल्याशिवाय तुम्ही पंढरपूरमध्ये पाय ठेऊ नका.” अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी मिंधे सरकारला सुनावले. रविवारी आळंदीमध्ये पोलिसांनी वारकऱ्यांवर अमानुषपणे लाठीमार केला. या मुद्दयावर त्यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.

Janmat News
Author: Janmat News

Read More