केळोली :- केळोलीतील ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठी सदैव वणवण व्हायची, डोक्यावरून पाणी आणावे लागत असे. खासदार श्रीनिवास पाटील यांच्या माध्यमातून केळोलीत जलजीवन योजना मंजूर करून माता-भगिनींच्या डोक्यावरील घागर उतरवल्याचे समाधान असल्याचे ग्रामस्थांकडून आभार व्यक्त करण्यात आले.

केळोली(ता. पाटण) येथे खासदार पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या जल जीवन मिशन योजनेंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ झाला.
खासदार श्रीनिवास पाटील साहेब यांच्या प्रयत्नातून चाफळभागातील कॆळोली गावासाठी ६६ लाख रुपयांचा निधी जलजीवन मिशन योजनेंतर्गत मंजूर झाला.केळोलीचे विद्यमान सरपंच श्री.काशीनाथ मोरे यांच्या पाठपुराव्याला यश आले व आज कामाचा शुभारंभ झाला आहे.या योजनेअंतर्गत दोन पाण्याच्या टाक्या व पाइपलाइन बदलणी व जोडणी कामाचा समावेश आहे यामुळेच वर्षानुवर्ष चाललेली लोकांची पायपीट थांबणार आहे,यास्तव ग्रामस्थांकडून आनंद व्यक्त होत आहे, याप्रसंगी मौजे केळोली (वरची) येथे जल जिवन मिशन योजनेमधुन कामाचे शुभारंभ करताना ग्रामपंचायत सदस्या सौ.सुषमाताई शिवाजी मोरे व इतर ग्रामस्थ मंडळ, केळोली.


Author: Janmat News





