जळगाव : गौतमी पाटील आणी वाद !! जसजशी गौतमी पाटीलला प्रसिध्दी मिळत गेली तसतसा वाद तीच्या पुढे आला.आता नवीन एक वाद समोर आला आहे “पाटील ” या तीच्य आडनावावरुन काही संघटनांनी गौतमी पाटीलला इशारा दिला आहे,तीने आपले खरे आडनाव लावावे नाहीतर तीचे कार्यक्रम महाराष्ट्रात होऊ देणार नाही. यावर छत्रपती संभाजीराजे यांना विचारले असता त्यांनी आपले मत स्पष्ट केले.

काय म्हणाले संभाजीराजे?
महिलांनी आपले गुण व कतृत्व दाखवायला पाहिजे. त्यासाठी सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभे राहायला हवे. मराठा समाजातच नाही तर अनेक समाजातील लोक सुद्धा पाटील आडनाव लावतात. त्यामुळे पाटील हे आडनाव नसून तो किताब आहे. कलाकारांना सुरक्षा मिळायला पाहिजे, असे मत संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांना संरक्षण दिले. त्यामुळे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. फक्त महिलांनाही स्वातंत्र्य आहे. महाराष्ट्र हे वेगळे राज्य आहे. म्हणूनच गौतमी पाटील यांच्या पाठीमागे उभे राहिले पाहिजे. कलाकाराला संरक्षण मिळाले पाहिजे, हे या मी मताचा आहे, असे संभाजीराजे म्हणाले आहेत.
लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) हिच्या आडनावावर काही मराठा संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर राज्यात नवा वाद सुरु झाला. गौतमी पाटीलने पाटील हे आडनाव वापरु नये अशी भूमिका काही संघटनांनी घेतली आहे. या प्रकरणावर आता स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी आपली भूमिका स्पष्ट मांडली आहे.






