Janmat News

साताऱ्याच्या पोरी अभ्यासात अव्वल : बारावीत मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९६.३५ टक्के; जिल्ह्याचा निकाल ९२.८७ टक्के. शिवाजी कॉलेजची पीयूषा दिव्यांगांत राज्यात प्रथम.

सातारा : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षांचा सातारा जिल्ह्याचा निकाल १२.८७ टक्के लागला आहे. यंदाही मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९६.३१ टक्के आहे. याही वर्षी बारावीच्या परीक्षेच्या निकालात जिल्ह्यात मुलींनीच आघाडी घेतली आहे. छत्रपती शिवाजी महाविद्यालयाची दिव्यांग विद्यार्थिनी पीयूषा सुनील भोसले हिने ८८.१७ टक्के गुण मिळवून राज्यात पहिला येण्याचा मान मिळवला आहे.

सातारा जिल्ह्यात बारावी परीक्षेसाठी ५१ परीक्षा केंद्र स्थापन करण्यात आली होती. २५६ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये परीक्षा पार परडली. परीक्षेसाठी ३५ हजार ३२५ परीक्षार्थीची नोंदणी झाली होती. प्रत्यक्ष परीक्षेत ३५ हजार ७६ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यात विज्ञान शाखेतून १७ हजार २७८, कला शाखेतून ८ हजार ९३५, वाणिज्य शाखेतून ७ हजार २९९, व्यावसायिक शाखेतून १ हजार ३२८; तर आयटीआयमधून २०६ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते.
बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेकांनी मोबाईलवर तर अनेकांनी नेटकॅमध्ये जाऊन आपला निकाल पाहिला. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांकडून आनंदोत्सवही साजरा करण्यात आला.

Janmat News
Author: Janmat News