Janmat News

शेततळ्यात बुडून महिलेसह 2 बालिकेचा मृत्यू; हेळगाव-पाडळी येथील दुर्दैवी घटना.

मसूर:- प्रतिनिधी : कराड तालुक्यातील पाडळी येथे शेततळ्यात पोहायला गेलेल्या 3  जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सोमवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत घटना स्थळावरुन मिळालेली माहिती अशी, पाडळी तालुका कराड येथे आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास शेततळ्यावर पोहण्यासाठी सुमारे 9 ते 10 जण गेले होते. यावेळी 3 जणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर 6 जणांना वाचवण्यात यश आले. या घटनेने संपूर्ण पाडळी परिसर हादरून गेला. या घटनेची नोंद मसूर पोलीस ठाण्यात झाली आहे. रागिणी रामचंद्र खडतरे वय 4, वैष्णवी गणेश खडतरे वय 15, शोभा नितीन घोडके वय 32 अशी मयत झालेल्यांची नावे आहेत. मृत्यू झालेल्या या तिघींचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात आणले आहेत.

 

Janmat News
Author: Janmat News