सर्तक रात्रगस्त मुळे मोटर सायकल, मोबाईल चोरटा जेरबंद व ४७,०००/- रुपयेचा मुद्देमाल हस्तगत उंब्रज पोलीसांची कारवाई.
उब्रंज प्रतिनिधी :- उंब्रज पोलीस ठाणे हद्दीत सहा. पोलीस निरीक्षक श्री. अजय गोरड यांनी रात्रगस्त करीता असणारे पो. उनि महेश पाटील, पो. हवा. ७६७ देशमुख, पो. कॉ २५१६ माने यांना सर्तक रात्रगस्त करणे बाबत सुचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे मौजे उंब्रज ता. कराड गावी पो. उनि महेश पाटील, पो. हवा. ७६७ देशमुख, पो. कॉ २५१६ माने असे रात्रगस्त करीत असताना एक इसम उंब्रज बाजारपेठेतील मारुती मंदिराचे आडोशास संशयीतरित्या अंधारात आपले स्वतःचे अस्तित्व लपवुन एखादा अपराध करणेचे उद्देशाने मिळून आला. त्याचे नाव विचारता त्याने त्याचे नाव दिनकर शामराव साळुंखे वय ३० वर्षे रा. येराड ता. पाटण जि. सातारा असे असलेचे सांगितले त्यावेळी त्यास त्याचे ताब्यातील मोटर सायकल क्र. एम एच ११ सी. एफ ४८४ व दोन मोबाईल बाबत मालकी हक्का बाबत माहिती विचारली त्याने कोणतीही समाधानकारक माहिती दिली नसल्याने त्यांचे विरुध्द उंब्रज पो. स्टेला गु. र. नं ३१३ / २०२३ महा. पो. अधि. कलम १२२, १२४ प्रमाणे गुन्हा दाखल करुन त्याचेकडे अधिक चौकशी करता त्याने दोन मोबाईल फोन व मोटर सायकल हि कराड शहर येथून चोरल्याची कबुली दिलेने सदर आरोपी नामे दिनकर शामराव साळुंखे वय ३० वर्षे रा. येराड ता. पाटण जि. सातारा यास पुढील कारवाई करीता कराड शहर पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे.

सदरची कारवाई मा. श्री. समीर शेख साो, पोलीस अधीक्षक साो सातारा, मा. श्री. बापू बांगर सो अप्पर पोलीस अधीक्षक सातारा, मा. डॉ. रणजीत पाटील साो, उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड विभाग कराड यांचे मार्गदर्शनाखाली उंब्रज पो. स्टे, चे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक अजय गोरड, पो. उपनिरीक्षक महेश पाटील, पो. हवा. सचिन प्रकाश देशमुख, पो. कॉ. श्रीधर श्रीमंत माने, पोलीस मित्र स्वप्नील मोरे, गौरव खवळे यांनी केलेली आहे.
Author: Janmat News





