उब्रंज : प्रतिनिधि – *इंदोली येथे भांडणात कोयत्याने वार करणारा मुख्य आरोपी पैलवान नयनेश निकम गजाआड*
*05 दिवसांची पोलीस कोठडी*
उब्रंज:- उंब्रज पोलीस स्टेशन हद्दीत मौजे इंदोली येथे दिनांक 07/05/2023 रोजी भांडणामध्ये नयन निकम व इतर 09/10 जणांनी यांने अधिक शंकर नागमले वय 27 वर्ष रा.इंदोली यास मारहाण करून नयन निकम यांने कोयत्याने डोक्यात व हातावर वार करुन गंभीर जखमी केले होते.

गुन्हा घडले नंतर आरोपी फरार झाला होता.काल दि.12/05/2023 रोजी मौजे इंदोली येथुन ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.
सदर आरोपीस आज रोजी मा.प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कराड यांचे समक्ष हजर केले असता 05 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.पुढील तपास सपोनि अजय गोरड हे करीत आहेत.
Author: Janmat News





