मुंबई : देशभरात वाद सुरू असतानाही बॉक्स ऑफिसवर ‘द केरळ स्टोरी’ची दमदार कमाई सुरू आहे. 5 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला सात दिवस पूर्ण झाले आहेत. गेल्या सात दिवसांत ‘द केरळ स्टोरी’ला प्रेक्षक-समिक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. काही राज्यांमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे तर काही राज्यांमध्ये चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र या गोष्टींचा कमाईवर फारसा परिणाम झाला नाही. ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट 100 कोटी क्लबमध्ये समाविष्ट होण्यापासून काही पावलंच दूर आहे.


द केरळ स्टोरी’ने सातव्या दिवशी 12.50 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. गेल्या सात दिवसांत चित्रपटाने 81.36 कोटी रुपये कमावले आहेत. त्यामुळे हा चित्रपट 100 कोटींपासून काही पावलंच दूर आहे. येत्या 2-3 दिवसांत हा टप्पा पार करण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
Author: Janmat News
Post Views: 85






