🐯 पाटणमध्ये बिबट्याचा धुमाकूळ! जाईगडे यांच्या घराजवळच्या शेडमधील 3 बकऱ्या ठार, १ घेऊन गेला; परिसरात भीतीचे वातावरण
प्रशासन करतय तरी काय? ग्रामस्थांकडून संताप व्यक्त.
घरांना वेढलेल्या शेडमधून बिबट्याने बकऱ्यांवर केला हल्ला; नागरिकांमध्ये मोठी दहशत.
डावरी (भालेकरवाडी): पाटण तालुक्यातील डावरी (भालेकरवाडी) येथील रहिवासी गणपत श्रीपती जाईगडे यांच्या मालकीच्या ४ बकऱ्यांवर रात्रीच्या वेळी बिबट्याने हल्ला करून त्यांना ठार केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, वाघाने त्यातील एक बकरी शेडमधून ओढून आपल्यासोबत घेऊन गेला आहे. ही घटना परिसरातील नागरिकांसाठी अतिशय चिंताजनक ठरली आहे, कारण ज्या ठिकाणी ही घटना घडली, ते शेड चारही बाजूंनी घरांनी वेढलेले आहे.
सविस्तर माहितीनुसार, गणपत जाईगडे यांनी त्यांच्या घराच्या अगदी जवळच बकऱ्यांसाठी शेड उभारले आहे. रात्री (30/10/2025), बिबट्याने या शेडमध्ये प्रवेश केला आणि तेथे बांधलेल्या चार बकऱ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात तीन बकऱ्या जागीच ठार झाल्या, तर एक बकरी बिबट्या घेऊन गेला.

बिबट्या थेट मानवी वस्तीच्या आणि घरांच्या मध्यभागी असलेल्या शेडमध्ये येऊन शिकार केल्यामुळे संपूर्ण भालेकरवाडीत मोठी दहशत पसरली आहे.
नागरिकांनी वन विभागाने या घटनेची तातडीने दखल घेऊन, पंचनामा करावा व नुकसानग्रस्त जाईगडे कुटुंबाला तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. तसेच, या भागात वाघाचा वावर वाढल्याने नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
Author: Janmat News




