कराड तालुक्यात बोगस मतदार असल्याचा सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांचा दावा.
कराड ( प्रतिनिधी) :- कापील ता.कराड येथे बनावट आधारकार्ड तयार करून मतदार नोंदणी करणाऱ्या सर्व लोकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांची कराड येथे पत्रकार परिषदेत मागणी.
कांग्रेस व इंडिया गठबंधन यांचे मतदान घोटाळा संदर्भात आंदोलन सुरू असतानाच कराड तालुक्यातील कापील गावातील सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांनी विधानसभा निवडणुकीत बोगस मतदार तयार झाले व त्यांनी विधानसभा निवडणुकीत मतदान केले असा अरोप केला आहे.
याबाबत आपल्याजवळ सर्व पुरावे आहेत असा दावा देखिल त्यांनी केला आहे तरी प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी व बोगस मतदारांना अटक करावी अन्यथा दि. १४-८-२०२५ पासून तहसील कचेरी समोर आमरण उपोषण करणार गणेश पवार यांचा प्रशासनाला इशारा. अशी माहिती त्यांनी आयोजित केलेल्या कराड मधील जूने सर्कीट हाऊस मधील पत्रकार परिषदेत दिली आहे.
Author: Janmat News




