Janmat News

आक्रोश अन् किंकाळ्यांनी हादरलं सयाजी राजे वॉटर पार्क, काटा आणणारा Video

अकलूजच्या सयाजी राजे वॉटर पार्कमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये पुण्याच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू झाला.

सोलापूर : अकलूजच्या सयाजी राजे वॉटर पार्कमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये पुण्याच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू झाला आहे, तर चार जण जखमी झाल्याची माहिती आहे, ज्यातल्या एकाची प्रकृती गंभीर आहे. तुषार धुमाळ असं अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तुषार धुमाळ हे पुणे जिल्ह्यातील भिगवणचे प्रसिद्ध एलआयसी उद्योजक आहेत.

तुषार धुमाळ हे त्यांच्या दोन मित्रांसह सयाजी राजे वॉटर पार्कमध्ये आले होते. यानंतर तिघेही राईडमध्ये बसले, पण राईडचा वेग वाढल्यानंतर अचानक पाळणा खाली कोसळला. राईडचा वेग जास्त असल्यामुळे पाळणाही त्याच वेगामध्ये खाली पडला आणि तुषार धुमाळ यांना गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर धुमाळ यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, पण उपचार सुरू व्हायच्या आधीच त्यांचा मृत्यू झाला. या अपघातामध्ये धुमाळ यांच्या दोन मित्रही जखमी झाले, पण त्यांना गंभीर दुखापत झाली नाही. धुमाळ यांच्या मित्रांनाही रुग्णालयात नेण्यात आलं आहे. https://youtube.com/shorts/ouFJPaN6mAI?si=lztg6gthyTulZlY8

अकलूजच्या या अपघाताचा धक्कादायक व्हिडिओही समोर आला आहे. राईड सुरू झाल्यानंतर काही वेळामध्येच पाळणा कोसळला आणि संपूर्ण पार्क आक्रोश आणि किंकाळ्यांच्या आवाजांनी हादरलं. आज दुपारच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे.

Janmat News
Author: Janmat News