वर्ल्ड न्यूज : भारतात आयफोन उत्पादने करू नका, असा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेला सल्ला ॲपलचे सीईओ टिम कुक यांनी मानला, तर भारताला ॲपलच्या साडेचार लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीपासून वंचित राहावे लागेल, तसेच विविध प्रकारच्या सुमारे अडीच लाख रोजगारालाही मुकावे लागेल. 
ॲपलने २०२३-२४ या आर्थिक वर्षात भारतात १.१६ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून, येत्या पाच वर्षांच्या काळात ३.३२ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची तयारी केली आहे. ॲपलने आयफोन अमेरिकेतच तयार करावेत, अशी सूचना अमेरिकेचे ट्रम्प यांनी कुक यांना केली होती.
Author: Janmat News





