गुरुकुल कॉन्व्हेंट स्कूलचा तरंग-2025 वार्षिक स्नेहसंमेलन व गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न.

नवी मुंबई ( प्रतिनिधी ) :- कोपरखैरणे येथे यशोदा एज्युकेशन ट्रस्ट संचलित गुरुकुल कॉन्व्हेंट स्कूलचा G.C.S TARANG वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा रविवार
दिनांक 16 फेब्रुवारी 2025 रोजी कै.शिवाजीराव अण्णासाहेब पाटील मैदान सेक्टर 15 ते 18 कोपरखैरणे नवी मुंबई येथे साजरा झाला.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे माजी खासदार मा. श्री संजीवजी नाईक साहेब, प्राना फाउंडेशनचे अध्यक्षा मा. सौ. डॉ. प्राचीताई नरेंद्र पाटील मॅडम,
भिवंडी म.पा. पतसंस्था व्यवस्थापक मा. श्री. सुभाष चव्हाण साहेब,पावणाईदेवी ट्रस्टचे अध्यक्ष मा. श्री.भीमराव असवले साहेब,
माजी नगरसेविका सौ.भारतीताई रविकांत पाटील ,माजी नगरसेवक रविकांत पाटील साहेब, आर एफ नाईक कॉलेज चे प्राचार्य मा.श्री. प्रताप महाडिक सर ,ज्ञानविकास विद्यालय चे खजिनदार मा. श्री विद्यानंद पाटील सर,ज्ञानवेल एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षा सारिका संजय जाधव मॅडम,
यशोदा एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षा मा.सौ. कविता भाऊ जाईगडे मॅडम, यशोदा एज्युकेशन ट्रस्टचे सचिव श्री. भाऊ मारुती जाईगडे सर,
यशोदा एज्युकेशन ट्रस्टचे सल्लागार मा.प्रकाश कदम, मा.उषाताई सुभाष चव्हाण मॅडम, समाजसेविका शितल पाटील मॅडम ,समाजसेवक ज्योतिराम भालेकर आणि यशोदा एज्युकेशन ट्रस्टचे सल्लागार मा. श्री.दिपराज सुळ सर कार्यक्रमास उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेचे व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने झाली.
त्यानंतर प्रमुख पाहुणे व मान्यवरांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन स्वागत करण्यात आले शाळेच्या अध्यक्षा मा. सौ. कविता जाईगडे मॅडम यांनी शाळेची प्रस्ताविका सादर केली. त्यानंतर प्रमुख पाहुणे मा. श्री. संजीवजी नाईक साहेब व सौ डॉक्टर प्राचीताई पाटील मॅडम यांनी मार्गदर्शनपर भाषण केले.
शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गुणगौरव करण्यात आला तसेच शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे निवेदक मा. श्री. रणजीत मोरे यांनाही सन्मानित करण्यात आले. नृत्यशिक्षक श्री सुरज बिरंबळे सर व टीम यांचाही सन्मान करण्यात आला.
शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे नृत्य अविष्कार सादर करून उपस्थित मान्यवरांचे व पालकांची मने जिंकली.
शाळेतील शिक्षक वृंद विद्यार्थी व पालकांनी सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.
अशा प्रकारे गुरुकुल कॉन्व्हेंट स्कूलचा वार्षिक G.C.S TARANG 2025 वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडला .
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतने करण्यात आली.

Janmat News
Author: Janmat News