Janmat News

कालेटेक नारायणवाडी शिवारात शार्टसर्किटने विस एकरातील ऊस जळून खाक.

काले (प्रतिनिधी:) :-  कालेटेक नारायणवाडी परिसरातील गावंदर या शिवारात आज दुपारी एकच्या सुमारास शॉर्टसर्किटने ठिणगी पडून तब्बल 20 एकरातील उभा असलेला ऊस जळून खाक झाला. यामुळे या विभागातील 34 शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे .

 

कालेटेक व नारायणवाडी या दोन्ही गावांना जोडणारा हा गावंदर परिसर आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस उभा असून तो ऊस कारखान्याच्या तोडीच्या प्रतीक्षेत आहे .आज दुपारी महावितरणचे लोड शेडिंग व इतर कामासाठी लाईट ट्रिपल झाली असताना या परिसरात असलेल्या डीपीवर एक खारुताई बसली होती .विजेचा प्रवाह जोरात आल्याने तिचा शॉर्टसर्किट लागून मृत्यू झाला आणि त्यादरम्यान तेथे मोठ्या प्रमाणात thingya पडल्या त्या उसाच्या क्षेत्रातच पडल्यामुळे त्या परिसरातले दुपारच्या दरम्यान भर उन्हात मोठ्या प्रमाणात आग लागली बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले आणि या परिसरातील सुमारे 20 एकरातील तब्बल 34 शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक झाला. या परिसरातील अनेक शेतकरी आकाशात धुराचे व आगीचे लोट पाहताच घटनास्थळी धावले त्यांच्या अनेकांच्या शर्तीने या परिसरातील सुमारे पुढील होणाऱ्या नुकसान टाळले गेले .त्यामुळे या परिसरातला सुमारे 30 एकरातील ऊस वाचण्यास मदत झाली या मोठ्या प्रमाणात आगीमुळे या परिसरातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे आगीची माहिती कळताच कृष्णा कारखान्याचे अनेक गट अधिकारी शेती अधिकारी या परिसरात येऊन नुकसानीची पाहणी केली. तसेच महावितरण विभागाचे अनेक अधिकारी या ठिकाणी आले व त्यांनी याबाबतची माहिती घेतली या परिसरात यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच अशी घटना घडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. काले गावचे तलाठी सचिन धवन व त्यांचे कर्मचारी घटनास्थळी येऊन स्थानिक शेतकऱ्यांचे पंचनामे केले व त्याचा अहवाल ही कारखाना व इतर ठिकाणी सादर केला आहे .तरी या परिसरातील शेतकऱ्यांचा जळालेला ऊस तातडीने कारखान्याने तोडून नेऊन सहकार्य करावे अशी मागणी येतील जळीतग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. त्याचबरोबर जळीत झालेल्या उसाची कारखान्याकडून कोणती कपात करू नये अशी मागणी येथील शेतकरी करत आहेत हातात तोंडाशी आलेला घास या परिसरात शॉर्टसर्किटच्या आगीने घेऊन नेला आहे त्यामुळे सर्व बाजूंनी शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे .याबाबत येथील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी येथील शेतकरी करत आहेत ही घटना दुपारी एकच्या सुमारास घडली मात्र या परिसरातील धुराचे लोट व आगीतून बाहेर पडणारी काळी राख या परिसरातील अनेक गावात पसरले होते त्यामुळे आगीचे भयानक या परिसरात याची देही याची डोळा अनेक शेतकरी पाहिल्यामुळे अनेकांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले या परिसरात असणारे विजेच्या तारा या अनेक शेतकऱ्यांच्या ऊस क्षेत्रातूनच जात आहे तरी त्यांचाही व्यवस्थित बंदोबस्त करावा अशी मागणी ही शेतकऱ्यांनी महावितरण ला केले असून संभाव्य होणाऱ्या घटना टाळून शेतकऱ्यांना सहकार्य करावे अशी मागणी या परिसरातील सर्व शेतकरी करत आहेत.

Janmat News
Author: Janmat News