Janmat News

कराडमध्ये जीवनसंजीवनी तंत्र.. व आकस्मिक आरोग्य समस्या बद्दल कार्यशाळा संपन्न.

कराड ( प्रतिनिधी ) :- कराडमध्ये जीवनसंजीवनी तंत्र.. व आकस्मिक आरोग्य समस्या बद्दल तातडीने करावयाची कृती प्रशिक्षण शिबीर आय एम ए कराड व लायन्स क्लब कराड, कृष्णा विश्व विद्यालयाच्या सहकार्यातून पार पडले.

भुलशास्त्रविशेषतज्ज्ञ देत आहेत शिक्षण ” जीवनसंजीवनी”तंत्राचे….

हॉस्पिटलबाहेर,कुठेही कोणत्याही कारणाने एखाद्याचे हृदय अचानकपणे हृदय बंद पडले तर ते परत सुरु करणेकरिता सामान्य माणसाने काय करायचे याचे हे प्रात्यक्षिक.भारतीय भुलशास्त्र संघटनेने हे तंत्र अनेक प्रयोगांती प्रमाणित केलेले आहे आणि ही एक आकस्मिक हृदयक्रिया बंद पडल्याने होणारे मृत्यू टाळण्यासाठी सुरु केलेली एक यशस्वी चळवळ.. यामध्ये एखाद्या व्यक्तीचे अचानकपणे जेव्हा हृदय बंद पडते त्यावेळी काही पायऱ्यांचे अनुकरण करुन त्या व्यक्तीच्या छातीवरती तातडीने लयबद्ध दाब दिल्यास ती व्यक्तीचे हृदय पुन्हा सुरु होणेस मदत होते… ही एक साधी, सोपी, सरळ, सर्वमान्य व सहजपणे करता येणारी यशस्वी पद्धत आहे ज्याचे शिक्षण भारतभर भुलशास्रविशेषतःज्ञ् प्रतीकात्मक मानवी देहावरती देत असून अनेक जीव वाचल्याची उदाहरणे व अनुभव येत आहेत. या तंत्राला इंग्लिशमध्ये ” Compression only Life support( COLS)” असे म्हटले जाते. प्रत्येक नागरिक हा ” जीवरक्षक “आहे ही संकल्पना उराशी बाळगून भुलशास्त्रविशेषतज्ञ अचानकपणे बंद पडलेले हृदय पुन्हा चालू करणेचे ( म्हणजेच ” Restart a Heart”) मोहीम अविरतपणे राबवत आहेत. यांचबरोबर भुलशास्त्र डॉक्टरांबद्दलची व संघटनेबद्दलची माहिती, अनेक आकस्मिक आरोग्यविषयक अडचणी याबद्दल माहिती व उपचार, अनेक वाईट सवयी उदा. दारू, तंबाखू यांचे वेसण, लट्टपणा यामुळे होणारे शारीरिक व आर्थिक नुकसान याबद्दल प्रबोधनही करत आहेत.          आजवर अंदाजे 5 ते 6 हजार लोकांना याचे प्रशिक्षण दिले असून, यापुढेही शाळा, कॉलेजेस, ऑफिसेस, पब्लिक places,या ठिकाणी अशाप्रकारचे लोकांना प्रशिक्षण देऊन लोकजागृती करण्यावर भर देणार आहे. अशी माहिती कार्यक्रमाचे संचालक/प्रशिक्षक डाॅ. जयवंत पाटील भूलशास्त्रज्ञ मानद सचिव यांनी दिली.

प्रशिक्षण देताना डॉ. जयवंत पाटील.

याप्रसंगी कराड मधील आयोजक शासकीय तंत्रविद्यानिकेतन महाविद्यालय कराड, आय एम ए कराड, लायन्स क्लब कराड नक्षत्र, आय एस ए कराड व कृष्णा विश्व् विद्यालय, कराड.यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

 

यावेळी डॉ. अनिल देसाई, अध्यक्ष आय एम ए, डॉ.लायनेस अनघा राजगुरू,प्राचार्य तंत्रनिकेतन,डॉ. सुरेश पाटील, उपप्राचार्य चंद्रकांत सेमिकेरी, पाटील मॅडम,

लायन्स क्लब नक्षत्र मेंबर्स गौरी चव्हाण,विद्या मोरे, इला जोगी,सुनीता पवार, जयश्री साने, सुजाता पाटील, शर्मिला ब्यास,व विद्यार्थी विद्यार्थिनी, सहाय्यक स्टाफ तसेच कराड पोलीस स्टेशन चे संदीप सूर्यवंशी, सह्ययक पोलीस निरीक्षक, वाहतुक शाखा, कराड व पोलीस स्टाफ, होमगार्ड्स उपस्थित होते.

Janmat News
Author: Janmat News