प्रशिक्षणार्थी महीला डॉक्टर वरील अत्याचाराविरोधात कराड येथे निषेध मूक मोर्चा.
( डॉक्टर व सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग. )
कराड ( प्रतिनिधी ) :- कोलकाता येथे विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिचा खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेचे पडसाद कराडमध्ये उमटले. रविवारी मूक मोर्चा काढून • निषेध केला. इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे या मोर्चाचे आयोजन केले होते. सामाजिक संघटना सहभागी झाल्या होत्या.
अत्यावश्यक व आपत्कालीन सेवा वगळता नियमित बाह्यरुग्ण तपासणी, शस्त्रक्रियेसह वैद्यकीय सेवा बंद ठेवल्या होत्या. सायंकाळी चार वाजता मूक मोर्चा काढण्यात आला. इंडियन मेडिकल असोसिएशनने देशभरात आंदोलन आणि निषेध मोर्चे आयोजित केले आहेत.

त्या पार्श्वभूमीवर कराडमध्ये मूक मोर्चा काढण्यात आला. कोलकाताच्या गुन्ह्याचा तपास प्रामाणिकपणे करावा. पुरावे नष्ट करणाऱ्यांवर कारवाई करावी, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
शहरातील दत्त चौकातून मूक मोर्चाला सुरुवात झाली. हा मोर्चा आझाद चौक, नेहरू चौक व चावडी
चौक येथून प्रीतिसंगमापर्यंत नेण्यात आला. या मोर्चात काही सामाजिक संघटनांसह डेंटल, आयुर्वेदिक, फिजिओथेरपीस्ट, नर्सिंग व अन्य वैद्यकीय संघटना सहभागी झाल्या होत्या. कृष्णा विश्व विद्यापीठातील डॉक्टर, विद्यार्थी व इतर स्टाफनेही मोर्चास पाठिंबा दिला.या मोर्चाचे आयोजन इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्याकडून करण्यात आले होते.याप्रसंगी आय. एम. ए. चे पदाधिकारी डॉ.अनिल देसाई,डॉ. जयवंत पाटील, डॉ.अनघा राजगुरू यांनी विषेश प्रयत्न केले.
Author: Janmat News





