Janmat News

मोमिता देबनाथ भीषण हत्याकांडाचा कराडमध्ये IMA कडून निषेध व (non- emergency)वैद्यकीय सेवा बंद…

  1. कराड ( प्रतिनिधी ) :- नियमित ( non-emergency)वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचे आवाहन….      ९ ऑगस्ट २०२४ रोजी, आरजी कार मेडिकल कॉलेज, कोलकाता येथे एका तरुण पोस्ट-ग्रॅज्युएट चेस्ट मेडिसिनच्या विद्यार्थीनीचा ड्युटीवर असताना क्रूरपणे सामुदायिक बलात्कार करुन हत्या करण्यात आली. या भीषण घटनेने वैद्यकीय समुदाय आणि देशाला धक्का बसला आहे. याच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी आधीच संप सुरू केला आहे. आणि इंडियन मेडिकल असोसिएशनने देशभरात आंदोलन आणि निषेध मोर्चे आयोजित केले आहेत.

    कराड येथील पत्रकार परिषदेत संबोधित करताना डॉ.जयवंत पाटील व अनघा राजगुरू.

या गुन्ह्याच्या तपासात कॉलेज प्रशासन आणि पोलिसांचा प्रतिसाद संशयास्पद होता आणि प्रामाणिकपणे तपास सुरू ठेवण्यास ते अयशस्वी ठरले. आर जी कार महाविद्यालय प्रशासन व पोलिस यांच्या संगनमताने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याने दिनांक १३ ऑगस्ट २०२४ रोजी, कोलकता उच्च न्यायालयाने राज्य पोलिसांना या प्रकरणाची जबाबदारी केंद्रीय तपास यंत्रणेला (CBI) हस्तांतरित करण्याचे आदेश दिले.

 

१५ ऑगस्ट २०२४ रोजी, आरजी कार मेडिकल कॉलेजला मोठ्या जमावाने तोडफोड केली आणि आंदोलन करणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांवर हल्ला केला. यावेळी जमावाने गुन्हा झालेली जागेचीही तोडफोड करुन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. हा घटनाक्रम डॉक्टर, विशेषतः महिलांच्या हिंसेच्या वाढत्या धोक्याचा आणि वैद्यकीय सुविधांमध्ये सुरक्षेच्या आवश्यकतेचा संकेत देतो.

 

या गुन्ह्यातील पीडितांच्या समर्थनार्थ आणि चालू असलेल्या हिंसाचारविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन १७ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ६ ते १८ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ६ पर्यंत २४ तासांच्या सेवा बंदीचा आवाहन करण्यात आले आहे.अत्यावश्यक व आपात्कालीन सेवा सुरू राहतील. पण नियमित बाह्यरुग्ण तपासणी आणि शस्त्रक्रिया बंद ठेवण्यात येतील.

पीडित महिला डॉक्टरांच्या कुटुंबीयास न्याय मिळवून देण्यासाठी या संपास समर्थन देऊन डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी योग्य ती यंत्रणा उभी करून कायद्यात बदल करण्याची मागणी आय एम ए चे,डॉ.अनिल देसाई,(अध्यक्ष ),डॉ.अनघा राजगुरू (मानद सचिव),डॉ. जयवंत पाटील, खजिनदार व सर्व कार्यकारी व इतर सदस्य आय एम ए कराड. केलेली आहे. असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे रुग्णांची गैरसोयी होऊ नये म्हणून कळविण्यात आले आहे.

Rahul Waghmare
Author: Rahul Waghmare