चाफळ ( प्रतिनिधी ) : – चाफळभागात बिबट्याकडून केळोली गावात शिरकाव करून शेळीची शिकार ,ग्रामस्थ भितीच्या छायेत.

चाफळभागातील केळोली गावात दिनांक ३ ऑगस्ट रोजी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन शेडात बिबट्याने शिरकाव करून शेतकरी प्रशांत आनंदा मोरे यांच्या शेळीवर हल्ला केला व शेळीला गंभीर जखमी केले यात शेळीचा मृत्यू झाला.बिबट्याकडून हल्ला झाल्याने कोंबड्या व इतर शेळ्यांच्या आवाजाने बाजूला झोपलेले आनंदा मोरे यांना जाग आली व त्यांनी बॅटरी चालू केली व त्यामुळे बिबट्याने पोबारा केला त्यामुळे आणखी अनर्थ टळला. मात्र या घटनेनंतर लोक धास्तावले आहेत.
चाफळभागात बिबट्याकडून शिकार होण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे तरी वनविभाग काहीच हरकत करत नाही. प्राण्यांवर हल्ला करता करता बिबट्या माणसावर हल्ला करण्याची वाट वनविभाग वाट पहातोय का अशी भागातून लोकांकडून संतप्त प्रतिक्रया येत आहे.मागील दोन वर्षांपासून पंचवीस ते पन्नास हल्ले बिबट्याकडून झाले आहेत व त्यात अनेक पाळीव प्राणी शिकार झाले आहेत. प्रशासन मात्र पंचनामा करून मोकळे होते मात्र वनविभागामार्फत कोणतीही ठोस उपाययोजना होत नाही त्यामुळे भागातील जनता त्रस्त झाली आहे व आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.यामध्ये कमी की काय म्हणून विद्युत वितरण विभागही भर घालत आहे चाफळभागात वारंवार लाईट बंद होते व रात्रीच्या वेळी लोकांना अंधारात राहवे लागत आहे त्यामुळे जंगली जानवरांचा गावात शिरकाव वाढला आहे तरी प्रशासनाने यामध्ये ताबडतोब लक्ष घालावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
Author: Janmat News





