गुरुकुल कॉन्व्हेंटमध्ये दिंडी सोहळा उत्साहात
नवी मुंबई (प्रतिनिधी) :- डावरी (ता. पाटण) गावचे सुपुत्र भाऊ जाईगडे यांनी नवी मुंबई येथे स्थापन केलेल्या यशोदा एज्युकेशन ट्रस्ट संचलित गुरुकुल कॉन्व्हेंट स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्ताने विठ्ठल नामाचा गजरात पालखी व दिंडी सोहळा काढण्यात आला.
पारंपरिक वेशभूषा करून डोक्यावर तुळशी वृंदावन व हातात भगवी पताका घेऊन हरिनामाच्या गजरात विठू नामाचा जयघोष करीत चिमुकले वारकरी दिंडीत
सहभागी झाले होते. फुगड्या, रिंगण, अभंग, लेझीम अशा वाद्यांसह दिंडी सोहळा उत्साहात झाला.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भाऊ जाईगडे यांच्यासह माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील, माजी नगरसेविका अॅड. भारती पाटील, माजी नगरसेवक रविकांत पाटील, कानिफनाथ शिंगाडे, दीपकराज सूळ आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक उपस्थित होते. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.
Author: Janmat News





