Janmat News

निखिल वागळेंवरील हल्ल्याचा सातारा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने जाहीर निषेध.

निखिल वागळेंवरील हल्ल्याचा जाहीर निषेध.
सातारा (प्रतिनिधी) :- ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर पुण्यात हल्ला करण्यात आला आहे. या घटनेचा सातारा जिल्हा पत्रकार संघ हल्ला विरोधी कृती समितीच्यावतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात येत आहे.

जेव्हा विचारांचा सामना विचारांनी करता येत नाही तेव्हा असे भ्याड हल्ले होतात.सुसंस्कृत महाराष्ट्रात जे घडतंय ते संतापजनक आणि चिंताजनक आहे. असे मत अ. भा. पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केले आहे.
पत्रकार आणि बुध्दिजीवींवर हल्ले केले जात आहेत. हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर होणारा हल्ला आहे. हे चित्र भयंकर असलयाने त्याचा विरोध झालाच पाहिजे. सातारा जिल्हा पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि जिल्हा संघाच्या वतीने या घटनेचा जाहिर निषेध करण्यात येत असल्याचे सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी सांगितले. त्याला सरचिटणीस दीपक प्रभावळकर, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे प्रसिध्दी प्रमुख दीपक शिंदे, परिषद प्रतिनिधी सुजित आंबेकर, उपाध्यक्ष दत्ता मर्ढेकर, तुषार भद्रे, पत्रकार हल्लाविरोधी समितीचे निमंत्रक राहुल तपासे, डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य उपाध्यक्ष सनी शिंदे, पत्रकार हल्लाविरोधी समितीचे समन्वयक शंकर मोहिते,मराठी पत्रकार परिषदेच्या महिला सरचिटणीस विद्या म्हासुर्णेकर व जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य, सातारा पत्रकार संघाचे सदस्य यांनी पाठिंबा दिला आहे.

Janmat News
Author: Janmat News