*ट्रेडिंगच्या नावाखाली शंभर कोटींहून अधिकचा गंडा.*
काहींनी पलायन केल्याची पाटणमध्ये चर्चा; फसवणुकीमुळे गुंतवणूकदार झालेत हवालदिल
पाटण ( प्रतिनिधी ) :- व्याजाला सोकला आणि मुद्दलाला मुकला’ अशा गुंतवणुकीच्या जाळ्यात अडकलेले अनेक गुंतवणूकदारांना झटपट श्रीमंतीच्या मोहातील तरुणांनी पाटण तालुक्यात ट्रेडिंग तथा शेअर्सच्या बेकायदेशीर फंड्यातून तब्बल शंभर कोटींहून अधिक रुपयांना गंडा घातल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. बेकायदेशीर पद्धतीने केलेली कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक रामभरोसे असली तरी एवढा मोठा पैसा आला कोठून ? याबाबत चौकशींचा ससेमिरा मागे लागू नये, म्हणून बहुतांशी मंडळींनी ‘तेरी भी चूप… मेरी भी चूप’ असे धोरण स्वीकारल्याचे चित्र आहे. प्रचंड व्याज परताव्याच्या नावाखाली झालेली कोट्यवधींची फसवणूक अंगलट आल्याने काहींनी पलायन केल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाल्याचेही चित्र पाहायला मिळत आहे. भूलभुलैया विश्वाच्या नादाला लागून तालुक्यातील काही तरुणांनी मासिक गुंतवलेल्या रकमांवर दहा टक्के परतावा देऊ, असे आमिष दाखवून लोकांकडून सुरुवातीला काही कोटी रुपये गोळा केले. पहिले काही महिने नियमित दहा टक्के परतावाही केल्याने याच लालसेपोटी मग सुशिक्षित व सुसंस्कृत मंडळींनीही भरमसाट व्याज आणि अवघ्या दहा महिन्यांत दामदुप्पट मिळणार या लालसेपोटी स्वतः सह नातेवाईक, मित्र आदींनाही यांनाही यात पैसे गुंतवायला भाग पाडले. काही महिन्यातच हा आकडा जवळपास नव्वद कोटींच्याही पुढे गेला. पैसे गोळा करणाऱ्या तरुणांकडे आलिशान गाड्या, वस्तू पाहून अनेक तरुण मंडळीही याकडे आकर्षित झाली. झपाट्याने पैसे गोळा करून ते बड्या शहरातील या व्यवसायातील वरिष्ठ मंडळीकडे हे पैसे गुंतवायला देऊ लागली. कालांतराने यात गुंतवणूकदारांचा लोंढा व तांत्रिक अडचण लक्षात घेता मग परतावा दहा टक्केवरून पाच नंतर चार, तीन टक्के असा करण्यात आला. सुरुवातीला जोमात असणारा हाच उद्योग नंतर वरिष्ठांकडून मूळ हेतू
* शिक्षक, नंबर दोन, गणवेशात
• अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही चुना
• स्थानिक तसेच ग्रामीण भागातील युवा वर्गासह गुंतवणूकदार हवालदिल
• फसवणूक झाली की केली? याबाबत अनेकांमध्ये संभ्रम
साध्य झाल्यानंतर दरमहा मिळणाऱ्या रक्कम दोन नंतर चार महिन्यांनी मिळू लागल्या आणि हळूहळू त्या पूर्णपणे बंदही झाल्या आहेत. त्यानंतर मात्र स्थानिक गुंतवणूकदार अथवा पैसे गोळा करणारे संबंधित इथेच राहिले. मात्र मोठ्या शहरातील भामट्यांनी ही रक्कम घेऊन अन्यत्र पलायन केल्यानंतर मग स्थानिक मंडळींची यात प्रचंड मोठी आर्थिक गोची झाली. एका बाजूला गुंतवणूकदारांची पैशाची मागणी ही मंडळी पूर्ण करू शकत नव्हती. काहींनी तात्पुरतं घरातील सोने, वस्तू विकून, कर्ज काढून काही काळ परतावा देण्याचामहागड्या गाड्यांसह जीवघेणी स्पर्धा…‘अयाजीच्या जीवावर बयाजी उदार’ या म्हणीप्रमाणे अनेक तरुणांनी मोठ्या प्रमाणावर पैसा गोळा करून तो गुंतवला. त्यातून मग छाप पाडण्यासाठी ऑडी, बीएमडब्ल्यू, थार यासारखी महागडी वाहने तसेच अॅपलचे फोन, लॅपटॉप, भारी किमतींची घड्याळे अशा वस्तूंमुळे तरुणाईमध्ये क्रेझ निर्माण झाली होती. याच क्रेझचा फायदा घेऊन अनेकांनी यात कोट्यवधी रुपये गुंतवले. स्वतः सोवत इतरांना पैसे गुंतवण्यास सांगितल्याने अनेकजण आता फसवणुकीच्या रॅकेटचा भाग झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. चौकशी झाल्यास भानगडी बाहेर येण्याची चिन्हे सर्वाधिक परताव्याच्या आमिषाने शिक्षक, प्राध्यापक, नोकरदार या मायाजालात अडकले आहेत. एवढेच नव्हे तर वर्दीतले काही दर्दी अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केल्याची चर्चा आहे. मध्यंतरी वर्दीला खबऱ्या देत हप्ते गोळा करणाऱ्या एका टिप्परने परस्पर रकमा यात गुंतवल्या आणि त्या परत मिळाल्या नसल्याने तगादा लावण्यात आल्याने या त्रासातून सुटका करून घेण्यासाठी एकाने आत्महत्या केल्याची चर्चाही ऐकावयास मिळत होती. मात्र, चलाखीने या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी झाली, तर यातून अनेक भानगडी समोर येतील, असेही बोलले जात आहे. प्रयत्नही केला. मात्र, एकूण गुंतवणुकीत अडकलेले पैसे आणि संबंधितांचे भांडवल यात कमालीचे अंतर असल्याने यातील तफावत मोठ्या प्रमाणावर वाढतच गेली. यातून गुंतवणूकदारांचा ससेमिरा व कारवाईची भीती यामुळे काहींनी पलायन केले. पलायन केलेल्यांनी सुरुवातीला मोबाईल नंबर सातत्याने बदलले. मात्र, आता यापैकी अनेकांचे मोबाईलही लागतच नसल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत.
Author: Janmat News





