Janmat News

ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार ठार, कोयना नदी पुलावरील घटना; कराड

कराड( प्रतिनिधी) :- पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कोयना नदीच्या पुलावर एका दुचाकीस्वारास ट्रकची धडक बसल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली.

परवेज शमशुद्दीन मुल्ला (वय 35, रा. वहागाव, ता. कराड) असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून परवेज मुल्ला हे दुचाकीवरून निघाले होते. कोयना नदीवरील पुलावर त्यांची दुचाकी आली असता पाठीमागून आलेल्या अज्ञात ट्रकने त्यांना जोराची धडक दिली. त्यामध्ये त्यांच्या डोक्याला जबरी मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे काही काळ महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी कराड शहर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन वाहतुक सुरळीत केली. याबाबत रात्री उशिरापर्यंत कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.

Janmat News
Author: Janmat News