@what’s app फीवर@
#टांगा_पलटी_घोडा_फरार..!! #आजचे_राजकीय_वास्तव,.!
मंत्रालयात होत असतो, अधून मधून जुलमी करार,
लोकशाहीचे अंगण म्हणजे, टांगा पलटी घोडा फरार,!!
पक्षासाठी नेता नाही,नेत्यासाठी पक्ष नाही,
जनतेच्या हिताकडे,आता कुणाचं लक्ष नाही..!!
एका ताटात जेवू लागले,कौरव आणि पांडव,
कोणत्या पंक्तीत जेवण करवा,कळत नाही मांडव..!!
घुस उंदीर मुंगूस सगळे,एका बिळात घुसले,
विश्वासाचे रक्त त्यांनी, कुऱ्हाडीला पुसले.. !!
सत्तेसाठी लोकशाहीच्या,पायामध्ये घुंगरू..
खुर्चीसाठी इकडून , तिकडे फिरत असते शिंगरू..!!
संविधानाच्या होळीमध्ये,तत्व पेटली सारी,
पतिव्रतेच्या पावित्र्याला,वेश्या पडते भारी..!!
एका लाकडात हजार ,झेंडे कसे कुठे खोसायचे,
नेत्यांसाठी राबणाऱ्यांनी, किती हाल सोसायचे..!!
लोकशाहीचा तंबू झाला,जुगाराचा अड्डा,
मतदारांनो नेत्यांसाठी, खोदा आता खड्डा..!!
हॉटेल, डोंगर, झाडीमुळे, झाला असा कारभार,
लोकशाहीचं अंगण म्हणजे ,टांगा पलटी घोडा फरार..!!
© what’s app factor @
Author: Janmat News





