कराडमध्ये दुधात भेसळ करणाऱ्यांचा टोळीचा भंडाफोड, नऊ हजार लिटर बनावट दूध जप्त.

कराड :साताऱ्यातील कराडमध्ये दूध भेसळ करणाऱ्या 9 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. कराड येथील नवीन कवठे, केंजळे मळा, खराडे आणि हेळगाव या भागातील दुध संकलन केंद्रात भेसळ केली जात होती, त्यांच्याकडून 9 हजार लिटर बनावट दुध असा एकूण 30 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.

 

 

कराड येथील नवीन कवठे, केंजळे मळा, खराडे आणि हेळगाव या भागातील दूध संकलन केंद्रावर कारवाई करण्यात आली आहे. दुधात भेसळ करणारी एक टोळी कार्यरत होती. ही टोळी दुधामध्ये पॅराफिन,सोयाबिन तेल,व्हाईट लिक्विड,सोया ऑईलसह इतरही केमिकल मिक्स केले जात होते. दूध संकलन केंद्रातच दूध भेसळ करण्यात येत होती. पोलिसांनी या नऊ जणांना ताब्यात घेतले असून नऊ हजार लिटर बनावट दूध जप्त करण्यात आले आहे. तसेच सुमारे 30 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Vijay More
Author: Vijay More

मराठी न्यूज ब्रीफिंग